Sidharth-Kiara : प्रचंड भव्य आहे सिद्धार्थ – कियारा यांचं नवीन घर; व्हिडीओमध्ये पाहा एक झलक

| Updated on: Feb 12, 2023 | 9:52 AM

प्रचंड भव्य आहे सिद्धार्थ - कियारा यांच्या स्वप्नांमधील घर... सेलिब्रिटींच्या घराची एक झलक पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल थक्क... मुंबई याठिकाणी खरेदी केलेल्या नव्या घरातून सिद्धार्थ - किआरा करणार संसाराला सुरुवात...

Sidharth-Kiara : प्रचंड भव्य आहे सिद्धार्थ - कियारा यांचं नवीन घर; व्हिडीओमध्ये पाहा एक झलक
Sidharth-Kiara
Follow us on

Sidharth-Kiara : अनेक चर्चांनंतर अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांचं लग्न झालं आहे. लग्नानंतर सिद्धार्थ – किआरा यांच्याबद्दल रंगणाऱ्या चर्चांना उधाण आलं आहे. शाही लग्न सोहळ्यानंतर १२ फेब्रुवारी म्हणजे आज सिद्धार्थ – किआरा यांचं रिसेप्शन पार पडणार आहे. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत सिद्धार्थ आणि किआरा यांच्याबद्दल अनेक नवीन अपडेट समोर येत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ – किआरा यांच्या नव्या घराची एक झलक दिसत आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या नव्या घराची चर्चा रंगलेली आहे.

सिद्धार्थ – किआरा त्यांच्या नव्या घरातून नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जे घर दिसत आहे, ते घर किआरा – सिद्धार्थ यांचं असल्याचं सांगितलं जात आहे. लग्नाआधी सिद्धार्थ – किआरा नव्या घराच्या शोधात होते. अखेर दोघांना त्यांच्या स्वप्नांमधील घर मिळालं आहे. सिद्धार्थ – किआरा यांचं घर प्रचंड भव्य आणि आलिशान आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या सिद्धार्थ – किआरा त्यांच्या नव्या घरात राहत नसून पाली हिल याठिकाणी असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. पण लवकरच सिद्धार्ख – किआरा त्यांच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. आठवड्यापूर्वीच सिद्धार्थ – किआरा यांनी नवं घर खरेदी केलं आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सांगत आहे की, ‘सिद्धार्थ – किआरा यांनी आठवड्यापूर्वीच घर खरेदी केलं आहे.’ सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लग्न केलं आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये ७ फेब्रुवारी रोजी दोघांनी शाही अंदाजात लग्न केलं. आता सिद्धार्ध – किआरा यांच्या रिसेप्शन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या रिसेप्शनची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, रिसेप्शनमध्ये अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.

मुंबई याठिकाणी होणाऱ्या रिसेप्शन पार्टीमध्ये संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची आणि मुकेश अंबानी यांनी लग्नानंतर दोघांना दिलेल्या भेटवस्तूची चर्चा रंगत आहे .सिद्धार्ध – किआरा यांना रिलायन्स ट्रेंड फुटवियर (Reliance Trends Footwear) चं नवीन ब्रॉन्ड अॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं कधीही समोर आलं नाही. पण जेव्हा ‘शेरशाह’ सिनेमातून दोघे प्रेक्षकांच्या भोटीस आले, तेव्हा चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चहत्यांना प्रचंड आवडली. (kiara advani and sidharth malhotra relationship)