मुंबई : आतापर्यंत बॉलिवूडमध्ये एका पेक्षा सिनेमे चाहत्यांच्या भेटीस आले. अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) याने देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये ऍक्शन सीन दिल्यामुळे अक्षयची ओळख ‘खिलाडी’ कुमार अशी देखील आहे. पण अभिनेत्याचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. आता अक्षय कुमार स्टारर ‘रावडी राठोड’ सिनेमाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमातून अक्षयला बाहेरचा रस्ता दाखवला असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ‘रावडी राठोड’ सिनेमाच्या सिक्वलमध्ये अक्षय कुमार याच्या जागी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याची वर्णी लागली आहे. सध्या सर्वत्र अभिनेता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची चर्चा रंगत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री किआरा आडवाणी हिच्यासोबत लग्न केल्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला. तर दुसरीकडे सिद्धार्थ लवकरच अभिनेता दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ सिनेमातून पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
सध्या सिद्धार्थ मल्होत्रा ‘रावडी राठोड’ सिनेमामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २०१२ साली प्रदर्शित झालेल्या Rowdy Rathore सिनेमाच्या सिक्वलमध्ये सिद्धार्थ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अक्षयची जागा सिद्धार्थ घेणार असल्याची चर्चा रंगत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फिल्ममेकर शबीना खान Rowdy Rathore 2 सिनेमा बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.
सिनेमासाठी सिद्धार्थची निवड करण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आगे. निर्मात्यांच्या योजनेनुसार, येत्या दोन महिन्यात सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार असल्याच्या देखील चर्चांनी जोर धरला आहे. शिवाय अशा दिग्दर्शकांना संपर्क साधण्यात येत आहे, ज्यांनी गेल्यावर्षी अनेक ब्लॉकबस्टर सीनेमे बॉलिवूडला दिले आहेत. (sidharth malhotra rowdy rathore 2)
महत्त्वाचं म्हणजे, ‘राउडी राठोर 2’ च्या शूटिंगच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या तारखा मे अखेरीस जाहीर केल्या जातील. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या Rowdy Rathore सिनेमात अक्षय दुहेरी भूमिकेतून चाहत्यांच्या भेटील आला. चाहत्यांनी देखील सिनेमाला डोक्यावर घेतलं. शिवाय बॉक्स ऑफिसवर सिनेमाने तगडी कमाई केली. ( akshay kumar rowdy rathore)
आता ‘राउडी राठोर 2’ सिनेमातून अक्षय चाहत्यांच्या भेटीस येणार की नाही, यावर अद्याप माहिती मिळाली नाही. पण सध्या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्राची महत्त्वाची भूमिका असेल असं सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र ‘राउडी राठोर 2’ आणि सिद्धार्थ मल्होत्राचीच चर्चा रंगत आहे.