परदेशात फिरण्याचा खर्च परवडेल, पण Kiara Advani हिचा मंगळसूत्र नाही

| Updated on: Feb 10, 2023 | 10:22 AM

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची पत्नी आणि अभिनेत्री किआरा अडवाणी हिच्या मंगळसूत्राची किंमत थक्क करणारी, सोशल मीडियावर किआराच्या मंगळसूत्राच्या किंमतीची चर्चा...

परदेशात फिरण्याचा खर्च परवडेल, पण Kiara Advani हिचा मंगळसूत्र नाही
परदेशात फिरण्याचा खर्च परवडेल, पण Kiara Advani हिचा मंगळसूत्र नाही
Follow us on

Kiara Advani Mangalsutra Price : अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ आणि किआरा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा तुफान रंगत आहे. सिद्धार्थ आणि किआरा यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लग्नानंतर नवीन जोडप्याने विमानतळावर पापाराझींना एकत्र पोज दिली. सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर विमानतळावर पहिल्यांदा दोघांना एकत्र स्पॉट केल्यानंतर अभिनेत्रीचा साधा लूक कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. तेव्हा अनेकांची नजर किआराच्या मंगळसूत्रावर पडली. किआराच्या मंगळसूत्राची किंमत फार मोठी आहे. ज्यामध्ये एकदा तरी तुम्ही परदेशात जावून याल. सध्या सर्वत्र किआरा हिच्या मंगळसूत्राची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

मीडिया रिपोर्टर्सनुसार; मंगळसूत्राची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. किआरा अडवाणीचं मंगळसूत्र डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलं आहे. मंळसूत्राची किंमत २ कोटी रुपये आहे. किआरा हिचा मंगळसूत्र प्रचंड सिंपल आहे. ज्यामध्ये गोल्डन चैन आणि काळ्या रंगाचे बीड्स लागले आहे. शिवाय मंगळसूत्राच्या मध्यभागी एक मोठा डायमंड लागला आहे.

लग्नानंतर किआरा आणि सिद्धार्थ यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी १२ फेब्रुवारी रोजी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणाक आहेत. लग्नाआधी सिद्धार्थ – किआरा यांनीट नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण ७ फेब्रुवारी रोजी लग्नाचे फोटो पोस्ट करत दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.

अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील दोघांचे फोटो पोस्ट करत किआरा – सिद्धार्थ यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्नात किआरा हिने बेबी पिंक रंगाचा लेहंगा घातला होता. तर सिद्धार्थ याने रुबाबदार शेरवानी घातली होती. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री प्रचंड सुंदर दिसत आहे. इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत किआरा हिने कॅप्शनमध्ये, ‘आता आमची कायमची बुकिंग झाली आहे…’ असं लिहिलं आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही. ‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या. (kiara advani sidharth malhotra wedding)