सिद्धू मूसेवालाच्या आईने साजरा केला 59 वा वाढदिवस, काही दिवसांपूर्वीच दिला बाळाला जन्म आणि..

| Updated on: May 15, 2024 | 2:36 PM

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सिद्धू मूसेवाला याची भर रस्त्यामध्ये हत्या करण्यात आली. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली. सिद्धू मूसेवाला याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

सिद्धू मूसेवालाच्या आईने साजरा केला 59 वा वाढदिवस, काही दिवसांपूर्वीच दिला बाळाला जन्म आणि..
Charan Kaur
Follow us on

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. भर रस्त्यावर गोळ्या घालून सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यात आली. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर त्याचे आई वडील खचल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर सिद्धू मूसेवाला हा त्याच्या आई वडिलांचा एकटाच अपत्य होता. सिद्धू मूसेवाला याच्या निधनानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. सिद्धू मूसेवालाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. लॉरेन्स बिश्नोई याच्या सांगण्यावरून सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यात आली.

सिद्धू मूसेवाला याचे निधन होऊन 22 महिने उलटल्यानंतर त्याच्या आईने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सिद्धू मूसेवालाच्या आईने आयव्हीएफच्या मदतीने मुलाला जन्म दिला. हेच नाही तर सिद्धू मूसेवाला याची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला. या बाळाचे नाव शुभदीप ठेवण्यात आले, जे सिद्धू मूसेवालाचे खरे नाव होते.

आता नुकताच सिद्धू मूसेवालाच्या आईने आपला 59 वा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी सिद्धू मूसेवालाच्या आईच्या मांडीवर बाळ देखील दिसत आहे. चरण कौर यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

बलकाैर सिद्धू यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, तू नेहमीच खुश राहा. जिवनातील प्रत्येक चढउतारामध्ये तू माझ्यासोबत राहा. माझी आई आणि एक चांगली जीवनसाथी बनण्यासाठी धन्यवाद. नेहमीच तुझ्या चेहऱ्यावर हास्य राहो. आता बलकाैर सिद्धू यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

सिद्धू मूसेवाला याची हत्या केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. 14 एप्रिल 2024 रोजीच सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा आपल्या घरातच होता. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या भावानेच घेतली.