मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : सिनेविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या हत्येप्रकरणी प्रसिद्ध गायकाला जामीन मंजून झाला आहे. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्रीच्या हत्ये प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. संबंधीत प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला होता. अभिनेत्री निधनानंतर गायक समर सिंह याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तब्बल 7 महिन्यांनंतर गायकाला जामीन मंजूर झाला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, 26 मार्च रोजी आकांक्षा दुबेचा मृतदेह वाराणसीच्या सारनाथ येथील हॉटेलमध्ये आढळून आला होता. सुरुवातीला अभिनेत्रीने स्वतःलं संपवलं असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मात्र आकांक्षा हिच्या कुटुंबियांनी हत्या असल्याचे सांगत समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्यावर आरोप केले.
अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केल्यानंतर समर सिहं याला पोलिसांनी अटक केली. आता सात महिन्यांनंतर गायकाची तुरुंगातून सुटका झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गायकाने स्वतःचे चेहरा लपवला आणि चाहत्यांकडे देखील समर सिंह याने दुर्लक्ष केलं.
आझमगडमधील रहिवासी समर सिंह याला जामीन मिळताच त्याचे कुटुंबिय आणि गावकरी आनंदी झाले आहेत. गावात फटाके व मिठाई खाऊन आनंद साजरा करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहेत. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिने टोकाचं पाऊल उचललं.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना आकांक्षा दुबे आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं आढळून आलं होतं. वाराणसी याठिकाणी दोघे एकत्र राहात असल्याची माहिती समोर आली होती. गायकासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री त्रस्त होती. म्हणून तिने टोकाचं पाऊल उचललं असल्याची देखील माहिती समोर आली होती.
2019 मध्ये ‘मेरी जंग मेरा फैसला’ या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. यामध्ये तिने खेसारी लाल यादवसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने निरहुआ आणि पवन सिंग यांसारख्या भोजपुरी इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांसोबत काम केलं.