Smriti Irani Daughter Wedding : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहे. अभिनेत्री आथिया शेट्टी – क्रिकेटर केएल राहुल यांच्यानंतर नुकताच ७ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री किआरा अडवाणी – अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात लग्नसोहळा पार पडला. सिद्धार्थ – किआरा यांच्या लग्नानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटी देखील दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अशात अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या लेकीच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची लेक शनेल इराणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सेलिब्रिटी लग्नासाठी राजस्थान शहराची निवड करत आहेत. २०१८ साली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनस यांनी जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केलं. आता स्मृती इराणी यांची मुलगी नागौर जिल्ह्यातील खिंवसर फोर्ट याठिकाणी लग्नबंधनात अडकणार आहे. स्मृती इराणी यांनी लेकीच्या लग्नासाठी खिंवसर फोर्ट ७ फेब्रुवारी पासून ९ फेब्रुवारी पर्यंत बूक केला आहे.
लेकीच्या लग्नासाठी सृती इराणी यांनी खिंवसर फोर्ट बूक केला आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच पोस्टमध्ये अर्जुन याने शनेल हिला प्रपोज केला होतं. खिंवसर फोर्टमध्ये शनेल हिच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. ८ फेब्रुवारीला शनेलच्या हातावर मेहंदी लागणार आहे. शिवाय हळदी देखील आजच होणार आहे. तर लग्न ९ फेब्रुवारी रोजी लग्न सोहळा पार पडणार आहे. सध्या सर्वत्र स्मृती इराणी यांची लेक शनेल हिच्या लग्नाची तयारी सुरु आहे.
सांगायचं झालं तर, शनेल इराणी (shanelle irani) हिने अर्जुन भाल्ला (arjun bhalla) यांच्यासोबत २०२१ साली साखपुडा केला होता. अखेर दोन वर्षांनंतर शनेल आणि अर्जुन लग्नबंधनात अडकणार आहेत. लेकीच्या लग्नासाठी स्मृती इराणी खिंवसर फोर्टमध्ये पोहोचल्या आहेत.
शनेल आणि अर्जुन यांचा साखपुडा २०२१ मध्ये झाला होता. शनेल आणि अर्जुन यांच्या साखरपुड्याचे फोटो खुद्द स्मृती इराणी यांनी पोस्ट केले होते. खास फोटो पोस्ट करत स्मृती इराणी यांनी अर्जुन याच्या कुटुंबाचं स्वागत केलं होतं. आता शनेल आणि अर्जुन यांना पती -पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.
एक काळ असा होता, तेव्हा स्मृती इराणी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून चर्चेत होत्या. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेमध्ये त्यांनी ‘तुलसी’ या भूमिकेला न्याय देत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण काही वर्षांनी त्यांनी कलाविश्वाला रामराम ठोकत राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला.