बऱ्याच अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश करत आपलं नशीब आजमावलं. काहींना यश मिळालं तर काहींना नाही. बॉलिवूडमधील अधीच एक अभिनेत्री आहे जिचे नाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये तसेच टेलिव्हीझनमध्ये प्रचंड गाजलेलं असतानाही राजकारणात एन्ट्री केली आणि तिथेही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आज ही अभिनेत्री केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वाचं खातं सांभाळणाऱ्या कॅबिनेट मंत्री आहेत.
महिला कॅबिनेट मंत्री होत्या 26 वर्षांपूर्वी मिस इंडिया स्पर्धा गाजवली
सध्या केंद्रीय मंत्रीमंडळा महिला आणि बालविकास खात्याची धुरा सांभाळणाऱ्या स्मृती इराणी यांनी एकेकाळी छोटा पडदा गाजवला, प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पण, त्याहीआधी त्या मॉडेलिंग क्षेत्रातही बऱ्याच सक्रीय होत्या.
एवढच नाही तर त्या 26 वर्षांपूर्वी मिस इंडिया ही सौंदर्यस्पर्धा गाजवणारी सौंदर्यवती आहेत. त्यांचे मॉडेलिंग करत असतानाचे फोटो जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला अजिबात ओळखू येणार नाही की त्या स्मृती इराणी आहेत ते.
एकता कपूरनं शेअर केला व्हिडीओ
दरम्यान स्मृती इराणी यांची खास मैत्रिण एकता कपूरनं त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. एकताने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या खास मैत्रिणीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये स्मृती इराणींचा 26 वर्षांपूर्वीचा रॅम्पवॉक पाहायला मिळतोय.
1998 मध्ये त्यांनी मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये त्या पोहोचल्या होत्या . याचदरम्यानचा एकतानं त्यांचा एक व्हिडीओ सर्वांसमोर आणला होता जो आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. तसेही सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काहीच नेम नसतो. हा व्हिडीओसुद्धा अगदी तसाच अचानकच चर्चेचा विषय ठरला आहे.
स्मृती यांच्या रॅम्पवॉकचा व्हिडीओ
स्टायलिस्ट कपडे, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास हे विषेश गुण स्मृती यांचा हा व्हिडीओ पाहताना लक्षात येतं.एकताने हा व्हिडीओ शेअर करत मैत्रिणीचे कौतुक करणारं कॅप्शनही लिहिलं होतं.
स्मृती यांचा हा व्हिडीओ किंवा जुने फोटो पाहून हे अजिबात वाटत नाही की या केंद्रीय मंत्रीमंडळात असणाऱ्या महिला मंत्री स्मृती इराणी आता मात्र राजकारणात प्रचंड संयमी आणि एकनिष्ठ असं त्यांचे रुप पाहायला मिळतं.