फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर खूपच अपडेट आहे. याचा अंदाज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन येतो.
नुकतंच सोनम कपूरनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यामध्ये ती सर्वोत्कृष्ट व्हाईट ड्रेसमध्ये दिसली आहे. तुम्हीही तिच्या या लूकच्या प्रेमात पडाल.
या ड्रेसमध्ये ती क्लासी दिसतेय आणि हा ड्रेस उन्हाळ्यासाठी उत्तम आहे.
तुम्हाला हा ड्रेस विकत घ्यायचा असेल तर हा ड्रेस खरेदी करणं इतकं सोपं नाही कारण त्याची किंमत आपल्याला आश्चर्यचकित करेल. हा ड्रेस लंडनस्थित आंतरराष्ट्रीय फॅशन हाऊस वाराणाचा आहे, त्यासाठी तुम्हाला 1500 पौंड अर्थात अंदाजे 1,55048 रुपये खर्च करावे लागतील.
तसेच सोनम कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक ड्रेसमध्ये आणखी काही फोटो शेअर केले आहेत, यामध्येही ती खूपच सुंदर दिसत आहे.