मुंबई : झगमगत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगत आहे. सध्या अभिनेत्री ‘पोन्नियिन सेलवन 2’ सिनेमाच्या यशाचा आनंद लुटत आहे. सिनेमामुळे चर्चेत असल्यामुळे शोभिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील चर्चांनी जोर धरला आहे. याच दरम्यान अभिनेत्रीने नागा चैतन्य हिच्यासोबत असणाऱ्या नात्यावर मौन सोडलं आहे. ‘पोनियिन सेल्वन 2’ सिनेमाविषयी बोलताना शोभिता धुलिपालाने मुलाखतीत नागा चैतन्यला डेट करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहे..
अभिनेत्री म्हणली, ‘मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला एका उत्तम सिनेमात काम करण्यासाठी संधी मिळाली. मी एक शास्त्रीय नृत्यांगना देखील आहे… मला नृत्य करायला आवडतं… मणिरत्नम यांच्या सिनेमातील एआर रहमान यांच्या तीन गाण्यांवर परफॉर्म करणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता मला फक्त आणि फक्त माझ्या करियरवर फोकस करायचं आहे…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘ज्ञान नसताना जे लोक काहीही बोलत आहेत, त्यांना स्पष्टीकरण देणं मला गरजेचं वाटत नाही. जर मी काही चुकीचं काम करत नाही तर, मला गोष्टींचं स्पष्टीकरण द्यावं असं काहीही वाटत नाही… ‘ यावेळी अभिनेत्री नागा चैतन्य याच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील मौन सोडलं आहे. त्याच्याबद्दल उत्तर देण्याऐवजी किंवा स्पष्टीकरण देण्याऐवजी, आपण आपल्या जीवनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.शांत राहून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे…. असं देखील अभिनेत्री म्हणाली.
शोभिताच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, शोभिताला ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. नुकताच अभिनेत्रीने अभिनेत्री मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, त्रिशा, कार्ती, जयम रवी, जयराम यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली. आता शोभिता आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर स्टारर ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.
अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही… नागा चैतन्य – समंथा यांनी जेव्हा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. नागा चैतन्य – समंथा यांच्या घटस्फोटाला आता जवळपास एक वर्ष पूर्ण झालं असेल. पण त्यांच्या नात्याची सुरुवात १३ वर्षांपूर्वीच झाली होती. ‘ये माया चेसावे’ सिनेमातून दोघांमध्ये प्रेम बहरलं होतं. पण लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.