अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणी ओळखत नाही… असं कोणीच नसेल. गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिच्याबद्दल कोणत्या न कोणत्या चर्चा रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या हिने अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. ऐश्वर्या हिची स्टाईल फॉलो करण्याचा प्रयत्न अनेक मुली करत असतात. ऐश्वर्या सारखं बोलणं, तिच्यासारखं हसणं, तिच्यासारखे हावभाव… करण्याच्या प्रयत्नात अनेक तरुणी असतात.
आता देखील अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या ज्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती तरुणी हुबेहूब ऐश्वर्या राय हिच्यासारखी दिसत आहे. हुबेहूब ऐश्वर्या हिच्यासारख्या दिसणाऱ्या तरुणीचं नाव आशिता सिंग असं आहे.
आशिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रोज आशिता सोशल मीडियावर काही न काही पोस्ट करत असते. आशिता बॉलिवूड गाण्यांवर रिल्स देखील बनवत असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. आशिता हिच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या देखील फार मोठी आहे. आशिता हिचं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील आहे.
नेटकरी कायम आशिता हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. आशिता हिच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ही हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसते.’ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘सो स्वीट…’ सोशल मीडियावर आशिता हिचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात.
ऐश्वर्या हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ‘पोन्नियन सेल्वन 2 ‘ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आली होती. आता सध्या तरी ऐश्वर्या तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल घोषणा केलेली नाही. पण अभिनेत्रीला अनेक ठिकाणी लेक आराध्या हिच्यासोबत स्पॉट करण्यात येतं.
ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलं नाही. ऐश्वर्या हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.