नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा अडकणार पुन्हा लग्नबंधनात? पोस्ट पाहून म्हणाल…

| Updated on: Aug 11, 2024 | 12:42 PM

Samantha Ruth Prabhu on Marriage: कोणी घातली समंथा हिला लग्नासाठी मागणी, अभिनेत्रीने देखील असं उत्तर... पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त समंथा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा अडकणार पुन्हा लग्नबंधनात? पोस्ट पाहून म्हणाल...
Follow us on

दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य याने गर्लफ्रेंड शोभिता धुलिपाला हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. अनेक वर्ष नागा चैतन्य आणि शोभिता यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर नात्याला पती-पत्नीचं नाव देण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्य यांने दुसरा संसार थाटण्याचा निर्णय घेतल्यानंतर चाहते अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यासाठी चिंता व्यक्त करत आहेत. सांगायचं झालं तर, समंथा हिचा पहिला पती नागा चैतन्य याने यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, नागा चैतन्य याने दुसऱ्यांदा साखरपुडा केल्यामुळे एका चाहत्याने समंथा हिला लग्नाची मागणी घातली आहे. यावर अभिनेत्री उत्तर देखील दिलं आहे. सध्या सर्वत्र समंथा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने व्हिडीओ तयार करत समंथा हिला लग्नासाठी मागणी घातली आहे. व्हिडीओमध्ये चाहता समंथा हिला प्रपोज करतो आणि लग्न करण्यासाठी विनंती करतो. व्हिडीओमध्ये चाहता बॅग पॅक करून समंथाच्या घरी जाण्यासाठी निघाला आहे. म्हणजे तो अभिनेत्रीला प्रपोज करु शकेल…

हे सुद्धा वाचा

 

 

व्हिडीओमध्ये AI जीम आहे. कॅप्शनमध्ये चाहता म्हणतो, ‘मी माझी बॅग पॅक करून समंथा हिच्या घरी जात आहे. मला तिला सांगायचं आहे की, काळजी करु नकोस… कारण मी कायम तुझ्यासोबत आहे… मी लग्नासाठी तयार आहे. फक्त मला 2 वर्षांचा कालावधी दे, म्हणजे मी कमाई करु लागेल…’ व्हिडीओमध्ये चाहत्यांना अभिनेत्री गुडघ्यांवर बसून प्रपोज देखील केला आहे…

व्हिडीओ पाहिल्यानंतर समंथा म्हणते, ‘बॅकग्राउंडमध्ये जीम दिसत आहे. ज्यामुळे मी तयार झाली आहे.’ सध्या सोशल मीडियावर समंथा हिच्या उत्तराची देखील चर्चा रंगली आहे. समंथाची प्रतिक्रिया जाणून चाहता देखील आनंदी झाला आहे.

समंथा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करत आहे. 2017 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा यांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट झाल्याची घोषणा केली. घटस्फोटानंतर समंथा हिने अनेक अडचणींचा देखील सामना केला. दरम्यान, अभिनेत्रीची प्रकृती देखील खालावली… पण सर्व संकटांचा सामना अभिनेत्री हसत केला.

नागा चैतन्य – शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी 8 ऑगस्ट रोजी हैदराबाद याठिकाणी साखरपुडा केला. अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी मुलगा आणि होणाऱ्या सूनेचे फोटो पोस्ट करत दोघांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांच्या साखरपुड्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.