‘दारु पिणं बंद कर…’, द्वारकाधीश मंदिरात पोहोचलेल्या कंगना रनौतवर अनेकांनी साधला निशाणा

| Updated on: Nov 03, 2023 | 3:02 PM

Kangana Ranaut : कंगना रनौत हिच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना देखील माहिती आहे.. आता देखील नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

दारु पिणं बंद कर..., द्वारकाधीश मंदिरात पोहोचलेल्या कंगना रनौतवर अनेकांनी साधला निशाणा
Follow us on

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : अभिनेता कंगना रनौत (Kangana Ranaut) काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. ‘तेजस’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल करताना दिसला नाही. कंगनाचे सिनेमे सतत फ्लॉप होत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक चित्रपटगृहांमधून ‘तेजस’ सिनेमा हटवण्यात देखील आला आहे. सिनेमा फ्लॉप होतोय असं लक्षात आल्यानंतर अभिनेत्रीने ‘तेजस’ सिनेमा चित्रपटगृहात जावून पाहा अशी विनंती देखील चाहत्यांनी केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सतत मिळत असलेल्या अपयशा दरम्यान अभिनेत्री द्वारकाधीशचं दर्शन घेण्यासाठी पोहोचली. दर्शन घेतल्यानंतर काही फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो, व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.

द्वारकाधीशचं दर्शन घेतल्यानंतर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘गेल्या काही दिवसांपासून माझं मन व्याकुळ झालं होतं. द्वारकाधीशाचे दर्शन घ्यावेसं वाटलं… मला प्रचंड आनंद झाला आहे… मन देखील स्थिर झालं… असाच आशीर्वाद ठेव… हरे कृष्णा…’ सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कंगना हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

द्वारकाधीशाचं दर्शन घेतल्यानंतर कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. पण नेटकऱ्यांनी मात्र अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आता फक्त रिल्स बनव, सिनेमा करणं तुझ्याकडून होणार नाही…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुला असं पाहून प्रचंड वाईट वाटत आहे. डिप्रेशनमध्ये जत आहेस… असं वाटत आहे..’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आधी दारु पिणं बंद कर…’ अनेकांना कंगना हिच्यावर निशाणा साधला आहे.

कंगना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कोणत्याही मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देत कंगना स्वतः वाद ओढावून घेताना अनेकदा दिसते. एवढंच नाही तर, अभिनेत्री इंडस्ट्रीमधील अनेक गोष्टी देखील बेधडकपणे सर्वांना सांगत असते. कंगना कायम तिच्या खासगी आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर कंगनाच्या पोस्टवर असंख्या लाईक्स आणि कमेंट असतात. पण अभिनेत्रीचे सिनेमे पाहण्यासाठी मात्र चाहते चित्रपटगृहात जात नाही. असं चित्र अनेकदा समोर आलं.. आता कंगना ‘इमर्जन्सी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा खुद्द कंगना हिने दिग्दर्शित केला आहे.

‘इमर्जन्सी’ सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची कथा 1975 मधील आणीबाणीवर आधारित आहे. ‘इमर्जन्सी’मध्ये कंगनासोबत अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.