मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत मिसेस सोढी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवाल (Jennifer Mistry bansiwal) हिने निर्माते असित मोदी यांच्यासह ‘तारक मेहता….’चे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात तक्रार केली होती. आता याप्रकरणी सोहेल रमाणी याने मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे जेनिफर मिस्त्री हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असित मोदी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर होणाऱ्या आरोपांनंतर मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे…
सोहेल रमाणी, जेनिफर मिस्त्री हिच्या विरोधात म्हणाला, ‘जर जेनिफर मिस्त्री हिला मालिका आणि निर्मात्यांचा इतका त्रास होत होता तर २०१६ मध्ये पुन्हा मालिकेत परत का आली. तिला कोणी मालिकेत पुन्हा येण्यासाठी बळजबरी केली नव्हती… जेनिफर मिस्त्री हिने असित मोदी यांना मेसेज केला होता… मी आता सुधारली आहे, मला एक संधी द्या… असं ती म्हणाली होती…’
पुढे सोहेल रमाणी म्हणाला, ‘जेनिफर हिच्या वागणुकीत देखील अनेक बदल दिसून येत होते.. जेनिफर हिने जे काही केलं आहे, तो फक्त एक पब्लिसिटी स्टंन्ट आहे… ‘ शिवाय आमच्या विरोधात एफआयआर दाखल झाली असल्याची माहिती पोलिसांकडून आमच्यापर्यंत आली नाही… असं देखील सोहेल रमाणी म्हणाला… सोहेल रमाणी याच्या वक्तव्यानंतर हे प्रकरण कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. (jennifer mistry bansiwal shocking news)
मालिकेमध्ये मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. शिवायअसित मोदी वेळेत मानधन देत नाहीत… असे आरोप देखील मालिकेतील अनेक कलाकारांनी केले होते. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अनेक चढ उतार आले. ज्यामुळे मालिका तुफान चर्चेत आली. आता तर मालिकेच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.. (jennifer Mistry Asit Modi)