मुंबई : बॉलिवूडमधील गायिका सोना महापात्रा (Sona Mohapatra) तिच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. अशात तिने अभिनेत्री प्रीती झिंटाकडे (Preity Zinta) मोर्चा वळवला आहे. सोना महापात्राने सोशल मीडियावर एका युजर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रीती झिंटाचा उल्लेख पितृसत्ताचे भांडार म्हणून केला आहे. सोना महापात्राने मीटू संदर्भात ट्विटवर आपले मत मांडले होते. त्यावर एका युजर्सने लिहिले होते की, एमजे अकबर प्रकरणात कोर्टाला बोलू द्या… एखाद्या व्यक्तीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर स्वीटू, स्वीटूचे मीटू मीटू होते. (Sona Mohapatra targeted Preity Zinta)
This disgusting line ?? was plagiarised by this moron from an interview given by the silly,dim-witted,minion of patriarchy Priety Zinta, yesteryear decoration in films when asked about the @IndiaMeToo movement last year.The effect of celebrity culture & its sorry influence. ? https://t.co/qKVnrVnEP5
— Sona Mohapatra (@sonamohapatra) January 27, 2021
या युजर्सला उत्तर देताना सोना महापात्रा लिहिले की, या बकवास वाक्याला एका बेवकुफ व्यक्तीने पसरवले आहे. एका मुलाखतीमध्ये मुर्ख, मंद-बुद्धि आणि पितृसत्ताची लाडकी प्रीति झिंटा बोलली होती, जी गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांमध्ये डेकोरेट करण्याचे काम करत आहे. असे म्हणत सोना महापात्राने प्रीती झिंटाला डिवचण्याचे काम केले आहे. आता यासर्व प्रकरणावर प्रीती झिंटा काय उत्तर देते हे बघण्यासारखे आहे.
एका मुलाखतीमध्ये @IndiaMeToo चळवळीवर प्रीती बोलली होती. नोव्हेंबर 2018 मध्ये एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री प्रीती झिंटाला मीटू चळवळी विषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता की, काम करताना तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारच्या शोषणाचा सामना करावा लागला आहे का, यावर प्रीती म्हणाली, “नाही, मी कधीही असा सामना केला नाही. या प्रकरणावर प्रीती पुढे म्हणाली की, एखाद्या व्यक्तीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर स्वीटू, स्वीटूचे मीटू मीटू होते. यानंतर प्रीतीवर मोठ्या प्रमाणात टिका देखील करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
Radhe vs SMJ 2 | सलमान विरुद्ध जॉन अब्राहम ‘सामना, कोण मारणार बाजी?
नेपोटीझमच्या टीकेची भीती, बॉलिवूड एंट्रीपूर्वीच खुशी कपूर ‘अभिनय शाळेत’ दाखल!
(Sona Mohapatra targeted Preity Zinta)