वडील हॉस्पिटलमध्ये असताना सोनाक्षीच्या हनिमूनचे रोमँटिक फोटो व्हायरल
मुलगी सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशातच सोनाक्षी तिच्या सोशल मीडियावर पती झहीर इक्बालसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करताना दिसतेय.
1 / 5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुलगा लव सिन्हाने मंगळवारी दिली. एकीकडे शत्रुघ्न सिन्हा हे आजारी असताना दुसरीकडे सोनाक्षीने सोशल मीडियावर हनिमूनचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
2 / 5
लग्नाच्या नऊ दिवसांनंतर सोनाक्षी आणि झहीर हनिमूनला गेले आहेत. सोनाक्षी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये झहीरसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करतेय. 'सुंदर सूर्यास्त' असं कॅप्शन देत सोनाक्षीने हा पूलमधील फोटो पोस्ट केला आहे.
3 / 5
झहीरसुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सोनाक्षीसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतोय. या दोघांनी 23 जून रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर 'बॅस्टियन' या हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं.
4 / 5
सोनाक्षीच्या लग्नाबाबत तिच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. त्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया देत, मुलीच्या लग्नासाठी खुश असल्याचं म्हटलं होतं. तर भाऊ लव सिन्हाने मात्र "काही लोकांशी मला काहीच संबंध ठेवायचे नाहीत" असं म्हटलंय.
5 / 5
झहीर आणि सोनाक्षी हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. झहीरने 'नोटबुक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र त्याला फिल्म इंडस्ट्रीत अपेक्षित असं यश मिळालं नाही.