सोनाक्षी सिन्हाचं सासरी दमदार स्वागत, नणंदने काढली नजर, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jun 24, 2024 | 2:17 PM

Sonakshi- Zaheer Wedding Reception: झहीर इक्बाल याच्या घरी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचं जोरदार स्वागत, नणंदने काढली नजर, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..., सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये फक्त सोनाक्षी - झहीर यांच्या लग्नाची चर्चा...

सोनाक्षी सिन्हाचं सासरी दमदार स्वागत, नणंदने काढली नजर, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने रविवारी मुंबई येथील वांद्रे याठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत रजिस्टर मॅरिज केलं आहे. झहीर आणि सोनाक्षीने त्यांच्या कोर्ट मॅरेजनंतर दादरमधील बॅस्टियन येथे भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं होते. रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. झहीर आणि सोनाक्षी यांच्या रिसेप्शनसाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर सोनाक्षी हिचं सासरी दमदार स्वागत करण्यात आलं.

सासर प्रवेश केल्यानंतर सोनाक्षी हिच्या नणंदने अभिनेत्रीचा नजर देखील काढली. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, व्हायरल होत असलेला व्हिडीओ लग्नापूर्वीच्या विधी दरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये सोनाक्षी भावूक झाल्याचं दिसून येत आहे.

 

 

व्हिडीओमध्ये झहीर याची बहीण जन्नन वासी लोखंडवाला दोघांची नजर काढताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत जन्नत म्हणाली, ‘माझा भाऊ आता विवाहित आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा पा आणि सोना… दोघांसाठी खूप आनंदी आहे…’ असं तिने व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे.

सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांचं मुंबईतील शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट बॅस्टियनमध्ये लग्नाचे रिसेप्शन होतं. या जोडप्याचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांव्यतिरिक्त, बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती.

खुद्द सोनाक्षी हिने देखील लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत. आजचा दिवस खास आहे… सात वर्षांपूर्वी याच दिवशी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. प्रेम एक सुंदर भावना आहे आणि तेव्हाच ठरवलं की आता आयुष्यभर सोबत राहायचं…’

 

 

‘या प्रेमाने अनेक संकटांचा सामना केला आहे. आज आम्ही दोघे या क्षणात आहोत… आमच्या दोन्ही कुटुंबियांच्या शुभेच्छा आणि दोन्ही देवांचे आशीर्वाद असल्यामुळे प्रवास लग्नापर्यंत पोहोचला आहे. आम्ही पती – पत्नी झालो आहोत… सोनाक्षी – झहीर – 23.06.2024’ अशा भावना अभिनेत्री कॅप्शनच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

सांगायचं झालं तर, सोनाक्षी – झहीर गेल्या 7 वर्षांपासून एकत्र आहेत. अखेर दोघांनी त्यांच्या अखेर बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंडच्या नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं…. 23 जून 2024 मध्ये सोनाक्षी – झहीर यांनी लग्न केलं. झहीर – सोनाक्षी 23 जून 2017 पासून एकत्र आहेत.