अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने तब्बल सात वर्ष डेट केल्यानंतर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे सिव्हिल मॅरेज पद्धतीने यांनी केले आहे. अगोदर सिव्हिल मॅरेज केले आणि त्यानंतर एका जंगी पार्टीचे आयोजन सोनाक्षी आणि झहीरकडून करण्यात आले. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आपल्याच लग्नाच्या पार्टीत धमाकेदार डान्स करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली. सोनाक्षी सिन्हा हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका या केल्या आहेत. मोठ्या संपत्तीची मालकीन देखील सोनाक्षी सिन्हा आहे.
सोनाक्षी सिन्हा हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या हनिमूनचे फोटोही शेअर केले. आता नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना सोनाक्षी सिन्हा दिसलीये. सोनाक्षी सिन्हा हिने मुलाखतीमध्ये पती झहीर इक्बाल याच्या वाईट सवयीबद्दल भाष्य केले आहे. आता सोनाक्षीच्या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.
सोनाक्षी सिन्हा ही म्हणाली की, झहीर इक्बाल हा सीटी खूप जास्त छान वाजवतो. मात्र, तो सारखी सारखी सीटी ज्यावेळी वाजवतो, तेंव्हा मला त्रास होतो. एक वेळेनंतर मी खूप जास्त चिडते. सोनाक्षी सिन्हा पुढे म्हणाली की, 23 जून 2017 रोजी आम्ही प्रपोज केला होता आणि त्यानंतर 23 जून 2024 रोजी आम्ही लग्न केले.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांची पहिली भेट ही सलमान खान याच्या घरी झाली. पहिल्याच भेटीमध्ये हे दोघे कितीतरी तास गप्पा मारत बसले होते. त्यानंतर हे एकमेकांच्या संपर्कात आले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल कायमच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.
लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा हिने झहीरसोबतचे खास फोटो शेअर केले. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याचे सांगितले गेले. मात्र, लग्नामध्ये तिचे आई वडिल तिच्यासोबत असल्याचे बघायला मिळाले. मात्र, सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश यांनी तिच्यासोबतचे सर्व नाते तोडल्याचे सांगितले जाते.