सोनाक्षी सिन्हाने पहिल्या विधीनंतर लपवला चेहरा, लग्नाच्या पूर्वीच्या विधींना सुरुवात व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jun 21, 2024 | 9:15 AM

Sonakshi Sinha Marriage | सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, सर्वांच्या नजरा अभिनेत्रीच्या लूकवर पण तिने लपवला चेहरा आणि... व्हिडीओ व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा...

सोनाक्षी सिन्हाने पहिल्या विधीनंतर लपवला चेहरा, लग्नाच्या पूर्वीच्या विधींना सुरुवात व्हिडीओ व्हायरल
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा येत्या दोन दिवसांत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. 23 जून रोजी सोनाक्षी अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सर्वत्र जोर धरत असताना एक व्हिडीओ सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोनाक्षी हिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीला कारमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे.

कारमध्ये सोनाक्षी मागच्या सीटवर बसली आहे. कार पूर्ण काळ्या कपडाने झाकण्यात आली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीचा लूक लीक होणार आहे. लग्नापूर्वीचा लूक लीक व्हायला नको म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी अभिनेत्रीसोबत वडील शत्रुघ्न सिन्हा देखील उपस्थित होते.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी हळदीचा कर्यक्रम पार पडला आहे. ज्यामध्ये सिन्हा आणि इक्बाल कुटुंब उपस्थित होतं. शिवाय अभिनेत्री हळदीसाठी पिवळ्या रंगाचे कपडे नाही तर, दुसऱ्या हटक्या कपड्यांची निवड केली होती… अशी माहिती देखील समोर येत आहे.

सोनाक्षी हिच्या व्हिडीओ शिवाय सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शत्रुघ्न सिन्हा होणारा जावई झहीर याच्यासोबत दिसत आहेत. झहीर होणाऱ्या ससऱ्यांना कारपर्यंत सोडायला आला होता. तेव्हा पापाराझींनी दोघांना घेरलं… अशात शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील विनोदी अंदाजात ‘खामोश…’ म्हणत गाडीत बसले.

 

 

सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून सिन्हा कुटुंबियांमध्ये नाराजीचं वातावरण आहे… अशी चर्चा सुरु होती. पण आता सिन्हा आणि इक्बाल कुटुंब सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नात आनंदाने सहभागी झाल्याचं चित्र समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न सोहळा फार कमी लोकांमध्ये पार पडणार आहे. तर बॉलिवूडकरांसाठी आणि दिग्गज व्यक्तींसाठी रिसेप्शनपार्टीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. आता सर्वांना सोनाक्षी – झहीर यांच्या पती – पत्नीच्या रुपात पाहायचं आहे.