सोनाक्षी सिन्हा देणार गोड बातमी? ते फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

| Updated on: Oct 28, 2024 | 6:45 PM

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे. आता अभिनेत्रीच्या जवळ गुडन्यूज असल्याची चर्चा रंगत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद लुटणाऱ्या सोनाक्षीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सोनाक्षी सिन्हा देणार गोड बातमी? ते फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha) हिने यावर्षी 23 जून रोजी तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा तिच्या कुटुंबातून विरोध झाला होता. तिचे भाऊ यामुळे नाराज होते. पण सोनाक्षीच्या या तिच्या निर्णयावर वडिलांनी तिला साथ दिली. या जोडप्याने थाटामाटात लग्न न करता नोंदणीकृत विवाह केला होता. सोनाक्षीच्या लग्नात तिचे भाऊ लव आणि कुश उपस्थित नव्हते. पण इतर नातेवाईकांशिवाय जवळचे मित्र या लग्नाचा भाग बनले.

झहीरसोबत सोनाक्षीच्या लग्नाला ४ महिने झाले आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनाचा खूप आनंद घेत आहे. लग्नानंतर ती दोनदा हनिमूनलाही गेली होती. अलीकडेच या जोडप्याने एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली, जिथे त्यांनी फोटोशूटही केले. यादरम्यान अभिनेत्रीने अशी एक पोस्ट शेअर केली, ज्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी जोर पकडला आहे.

सोनाक्षी सिन्हा अनेकदा झहीर इक्बालसोबतचे फोटो शेअर करत असते. यावेळी तिने एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये झहीर आणि तिच्याृशिवाय आणखी कोणीतरी दिसत आहे. हे पाहून अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीचे तिच्या गरोदरपणाबद्दल अभिनंदनही केले. फोटोमध्ये सोनाक्षीने कॅप्शन दिलंय की, ‘Guess The Pookie’. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

सोशल मीडियावर लोकं सोनाक्षीचे अभिनंदन करत आहेत.  तिच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत. एका व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले – तुमच्या गर्भधारणेबद्दल तुझे अभिनंदन. दुसऱ्या व्यक्तीने लिहिले- येणाऱ्या बाळासाठी अभिनंदन. सोनाक्षी सिन्हाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना आणखी एका व्यक्तीने लिहिले – सोना प्रेग्नंट दिसत आहे. दुसऱ्या व्यक्तीने लिहिले – एका सुंदर जोडप्यासह एक गोंडस पिल्लू.

सोनाक्षी सिन्हा हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला ओटीटीवर मिळालेली दाद बॉलीवूडमध्ये मिळाली नाही. धाकड नावाच्या वेब सीरिजमध्ये ती दिसली आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाची प्रशंसा झाली. लग्नानंतरही अभिनेत्रीचे काही प्रोजेक्ट आहेत. सध्या ती निकिता राय आणि द बुक ऑफ डार्कनेस या चित्रपटाचा भाग असणार आहे. या चित्रपटात ती अर्जुन रामपालसोबत दिसणार आहे.