सोनाक्षी सिन्हाने एका डीलमध्ये कमवले कोट्यवधी रुपये, अभिनेत्रीला 9 कोटींचा फायदा, पण कसा?

| Updated on: Feb 04, 2025 | 8:08 AM

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचा एका डीलमध्ये कसा झाला 9 कोटीं फायदा? 'त्या' एका डीलमुळे सोनाक्षी सिन्हा झाली मालामाल... सोनाक्षी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत, आता मात्र...

सोनाक्षी सिन्हाने एका डीलमध्ये कमवले कोट्यवधी रुपये, अभिनेत्रीला 9 कोटींचा फायदा, पण कसा?
Follow us on

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तुफान चर्चेत आली आहे. आता अभिनेत्रीचा एका डीलमध्ये तब्बल 9 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. एका डील 9 कोटी रुपयांचा फायदा कसा? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर अभिनेत्रीने मुंबईत वांद्रे येथे असलेला स्वतःचा फ्लॉट विकला आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला मोठा फायदा झाला आहे. वांद्रे येथील फ्लॉट अभिनेत्रीने तब्बल 22.50 कोटी रुपयांना विकला आहे. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी स्क्वेअर यार्ड्सनुसार, सोनाक्षीने 81-ओरिएंट येथे असलेली मालमत्ता विकली आहे. एमजे शाह ग्रुपचा हा प्रकल्प आहे, जो 4.48 एकरमध्ये पसरलेला आहे. यात 4BHK अपार्टमेंट आहेत.

रिपोर्टनुसार, अपार्टमेंटचं कार्पेट क्षेत्रफळ 391.2 चौरस मीटर आहे आणि बिल्ट अप क्षेत्र 430.32 चौरस मीटर आहे. स्क्वेअर यार्डनुसार या व्यवहारात 1.35 कोटी रुपये स्टाम्प शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षीने हा फ्लॉट 2020 मध्ये 14 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला. आता दोन वर्षांत अभित्रीने तोच फ्लॉट 22 कोटी रुपयांमध्ये विकला आहे.

 

डीलमधून सोनाक्षी सिन्हाला मोठा फायदा झाला आहे. आकडेवारी पाहिली तर सोनाक्षी तिचा अपार्टमेंट 61 टक्के जास्त किंमतीला विकला आहे. सोनाक्षीचं 81-Ort मध्ये आणखी एक अपार्टमेंट आहे. मुंबईतील कॉमर्शियल हब असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) च्या जवळ असल्यामुळे, हे क्षेत्र कॉर्पोरेट आणि व्यावसायिक टायकूनसाठी निवासी क्षेत्र बनले आहे.

या परिसरातून ऑफिसला येण्या-जाण्यासाठी कमी वेळ लागतो. कनेक्टिव्हिटी हे या क्षेत्राचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी लिंक, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी मेट्रोमुळे या भागातील घरांचे भाव जास्त आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिची नेटवर्थ…

रिपोर्टनुसार, सोनाक्षी सिन्हाची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये आहे. सोनाक्षी सिन्हा एका सिनेमासाठी 2 -3 कोटी रुपये मानधन घेते… असं देखील सांगण्यात येत आहे. सिनेमांशिवाय सोनाक्षी जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते.