अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाला आता 38 दिवस झाले आहेत. फार कमी लोकांच्या उपस्थितीत सोनाक्षी – झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी सेलिब्रिटींसाठी मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. खुद्द सोनाक्षी – झहीर यांनी देखील सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. पण सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता असं देखील सांगितलं जातं होतं. शिवाय अभिनेत्रीचे भाऊ देखील लग्नात सामिल झाले नव्हते.
दरम्यान, अशी एक गोष्ट समोर येत आहे, ज्यामुळे अद्यापही सोनाक्षी सिन्हा हिच्या माहेरच्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं स्पष्ट होत आहे. सोनाक्षी हिच्या लग्नाला एक महिना झाला असला तरी, अभिनेत्रीची आई पूनम सिन्हा यांनी सोशल मीडियावर सोनाक्षी हिला फॉलो केलेलं नाही. सांगायचं झालं तर, पूनम सिन्हा इन्स्टाग्रामवर फक्त 6 जणांना फॉलो करतात. ज्यामध्ये सोनाक्षी नाही. शिवाय अभिनेत्री भाऊ लव सिन्हा देखील सोनाक्षीला फॉलो करत नाही. सोनाक्षी देखील आई आणि भावाला सोशल मीडियावर फॉलो करत नाही.
सोनाक्षी फक्त वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ कुश सिन्हा यांना फॉलो करते. लग्नाआधी सोनाक्षी सिन्हा हिच्या आईने लेकीला अनफॉलो केल्याची माहिती देखील समोर आली होती. यावर सोनाक्षी किंवा तिच्या कुटुंबियांपैकी कोणी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. लग्नानंतर सोनाक्षी खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, वांद्रे येथील घरात सोनाक्षी – झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने मनातील भावना देखील व्यक्त केल्या होत्या.
जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी – झहीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सोनाक्षी हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नानंतर सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.