अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने तब्बल सात वर्ष अभिनेता झहीर इक्बाल याला डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नात कुटुंबिय आणि खास मित्र उपस्थित होते. फार कमी लोकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. दरम्यान, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर सोनाक्षी हिने लग्नाबद्दल झहीर सोबत लग्नानंतर झालेल्या ट्रोलिंगवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, ‘लग्नानंतर अनेकांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. संमिश्र भावना होत्या काहीही कळत नव्हतं. कारण ऑनलाईन आम्ही अनेक गोष्टी वाचत होतो. त्यानंतर आम्ही विचार केला आपला दिवस आहे आणि आपण एकमेकांकडे लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.’
‘दुसरे लोकं आपल्याबद्दल काय बोलत आहेत. याचा विचार आपण करायला नको. आपण एकमेकांना सात वर्ष डेट केलं आहे. त्यामुळे आपण प्रेम साजरा करायला हवा… लोकं काय विचार करत आहेत. याचा विचार आपण करायला नको… आम्ही दोघांनी विचार केला खड्ड्यात गेली दुनिया… जेव्हा आम्ही लग्न केलं तेव्हा माहिती नाही काय बदल झाले. आमच्या दोघांमध्ये आम्हाला फक्त प्रेम दिसलं…’
पुढे सोनाक्षी म्हणाली, ‘आमच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या डोळ्यात आम्हाला आमच्याबद्दल फक्त प्रेम दिसलं… ज्या लोकांना आमचं नातं मान्य आहे, त्यांनाच लग्नात बोलवायचं असं आम्ही ठरवलं होतं. मी लग्नासाठी प्रचंड उत्साही होती. पण झहीर सर्व गोष्टी हळू – हळू अनुभवत होता. सर्वत्र फक्त आणि फक्त सकारात्मक वातावरण होतं.’ असं देखील सोनाक्षी म्हणाली.
सांगायचं झालं तर, सोनाक्षी हिने मुस्लिम मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सिन्हा कुटुंबात नाराजीचं वातावरण होतं अशी देखील चर्चा रंगली होती. शिवाय अभिनेत्रीच्या भावाच्या क्रिप्टिक पोस्टमुळे देखील खळबळ माजली होती. पण आता लग्नानंतर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. सोनाक्षी – झहीर एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.