सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल यांच्या लग्नाची पत्रिका लीक, खास आहेत पत्रिकेत लिहिलेलं ‘ते’ शब्द

| Updated on: Jun 14, 2024 | 12:57 PM

Sonakshi Sinha Marriage | सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची पत्रिका अखेर समोर आलीच... सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सोनाक्षी यांच्या लग्नाची चर्चा... कशी आहे लग्नाची पत्रिका... पत्रिकेवर असलेल्या 'त्या' शब्दांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष...

सोनाक्षी सिन्हा - झहीर इक्बाल यांच्या लग्नाची पत्रिका लीक, खास आहेत पत्रिकेत लिहिलेलं ते शब्द
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू असताना लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर लीक झाली आहे. त्यामुळे सोनाक्षी नव्या आयुष्याची सुरुवात करणार… यावर शिक्कामोर्तब झाला आहे. 9 जूनपासून दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर 23 जून रोजी लग्न आहे. आता दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील समोर आली आहे.

सोशल मीडियावर सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे…. मॅगझीनच्या मुखपृष्ठाप्रमाणे दोघांच्या लग्नाची पत्रिका आहे. फोटोवर बॅकग्राउंट साऊड देखील आहे. त्यामध्ये सोनाक्षी म्हणते, ‘आमच्या सर्व मित्रांना, गुप्तहेर आणि कुटुंबियांना हाय…’

हे सुद्धा वाचा

 

 

‘आम्ही सात वर्षांपासून एकत्र आहोत… कथित गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंडपासून आम्ही पती – पत्नी होणार आहोत… हा सोहळा तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही… त्यामुळे 23 तारखेला काहीही काम असेल ते बाजूला ठेवा लग्नाला या…’ असं म्हणत सोनाक्षी – झहीर यांनी सर्वांना लग्नासाठी आमंत्रित केलं आहे.

सोनाक्षी – झहीर यांचं लग्न अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा हॉटेल Bastian At the Top मध्ये होणार आहे. पत्रिकेत ‘अफवा खऱ्या आहेत…’ असं लिहिलं आहे… शिवाय पाहुण्यांना ड्रेस कोड देखील ठरवून देण्यात आला आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या 7 वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या एक वर्षापासून दोघे लिव्हइन-रिलेशनशिपमध्ये राहात आहेत… असं देखील सांगितलं जात आहे.

सोनाक्षी – झहीर यांच्या ओळखीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान याच्या पार्टीमध्ये दोघांची पहिली ओळख झाली. त्यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी – झहीर यांनी एकत्र स्क्रिन देखील शेअर केली आहे. ‘डबल एक्सएल’ सिनेमात दोघंनी एकत्र काम केलं आहे.

सोनाक्षी – झहीर यांच्या यांच्या वयात असलेलं अंतर?

सोनाक्षी सिन्हा हिचा जन्म 2 जून 1987 मध्ये झाला आहे. अभिनेत्री आता 37 वर्षांची आहे. झहीर याचा जन्म 10 डिसेंबर 1988 मध्ये झाला. अभिनेता आता 35 वर्षांचा आहे. म्हणजे सोनाक्षी झहीर याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.