Sonali Bendre | ‘भयानक असतं, जेव्हा मुलगा श्वासही घेवू शकत नाही…’, लेकाच्या प्रकृतीबद्दल सोनालीकडून मोठा खुलासा

| Updated on: Jun 03, 2023 | 4:21 PM

'मुलाचा श्वास थांबला तेव्हा जग थांबल्या सारखं वाटलं...', मुलाच्या प्रकृतीबद्दल जेव्हा सोनाली बेंद्रेने केले होता मोठा खुलासा... सध्या सर्वत्र सोनाली आणि तिच्या मुलाची चर्चा

Sonali Bendre | भयानक असतं, जेव्हा मुलगा श्वासही घेवू शकत नाही..., लेकाच्या प्रकृतीबद्दल सोनालीकडून मोठा खुलासा
Follow us on

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आजही सोनालीचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात. पण गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे. पण टीव्हीच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. कर्करोगावर मात केल्यानंतर सोनालीने पुन्हा झगमगत्या विश्वात दमदार पदार्पण केलं. अभिनेत्री नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने मुलगा रणवीर बहल याच्या आजाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या मुलाच्या प्रकृतीची चर्चा सुरु आहे.

अभिनेत्री सोनालीचा मुलगा रणवीर बहल अस्थमा या आजाराने त्रस्त आहे. मुलाच्या आजाराबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘माझा मुलगा अस्थमाने त्रस्त आहे. जेव्हा तुमच्या भोवती या आजाराने कोणी प्रभावित नसेल तर, तुम्ही विचार नाही करु शकत की हा आजार नक्की काय आहे. तर आपण अस्थमा सारख्या आजाराला साधं कसं म्हणू शकतो?’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘ती परिस्थिती चिंता व्यक्त करणारी असते, जेव्हा तुमचं बाळ श्वास देखील घेवू शकत नाही. मुलाला श्वास घेता येत नाहीये आणि आपण ते पाहतोय.. यापेक्षा अधिक भयानक काही नसू शकतं. संपूर्ण जग त्याठिकाणी थांबल्या सारखं वाटतं. श्वास आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मुलगा श्वास घेवू शकत नाहीये ही गोष्ट आईसाठी प्रचंड दुःख देणारी असते…’

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर एक मुलाखतीत सोनालीने तिच्या वडिलांच्या अस्थमाबद्दल देखील सांगितलं, ‘माझ्या वडिलांना देखील अस्थमा आहे. त्यामुळे वडिलांना देखील या आजाराचा सामना करताना पाहिलं आहे. माझ्यासाठी ही एक प्रक्रिया होती, जी माझ्या जीवनात लहानपणापासून सुरू झाली होती. माझ्या वडिलांना श्वास घेण्यास त्रास व्हायचा तेव्हा आम्हाला त्यांची भीती वाटायची…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

सोनाली कायम सोशल मीडियावर मुलगा आणि पतीसोबत फोटो पोस्ट करत असते. सोनाली गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. २०१८ साली अभिनेत्री कर्करोग ग्रस्त असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दिली. तेव्हा अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर अभिनेत्री उपचारासाठी अमेरिकेत गेली होती. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर अभिनेत्री अनेक रिऍलिटी शोमध्ये देखील दिसली. सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.