पहिल्या पतीकडून घटस्फोट, श्रीमंत व्यक्तीसोबत दुसरं लग्न, सोनाली कुलकर्णीबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला आहेत माहिती?

| Updated on: Nov 03, 2023 | 1:21 PM

Sonali Kulkarni Birthday : भारतीय महिलांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सोनाली कुलकर्णीबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? घटस्फोटानंतर कोणासोबत केलं दुसरं लग्न? सोनाली हिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याबद्दल खास गोष्टी...

पहिल्या पतीकडून घटस्फोट, श्रीमंत व्यक्तीसोबत दुसरं लग्न, सोनाली कुलकर्णीबद्दल या गोष्टी तुम्हाला आहेत माहिती?
Follow us on

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोनाली हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. म्हणून अभिनेत्रीबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोनाली कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री तिच्या परखड वक्तव्यांमुळे देखील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आज सोनाली हिचा वाढदिवस असल्यामुळे तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू, ज्या कदाचित काही चाहत्यांना माहिती देखील नसतील…

सोनाली तिचा 43 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. अभिनय क्षेत्रात काम करत असताना सोनाली हिने स्वतःला फक्त मराठी इंडस्ट्रीपर्यंत मर्यादित ठेवलं नाही. अभिनेत्रीने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं… पण बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीला ‘दायरा’ सिनेमाच्या माध्यमातून ओळख मिळाली.

आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनाली हिने दोन लग्न केली आहेत. सोनाली हिचं पहिलं लग्न चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… घटस्फोटानंतर देखील अभिनेत्री चर्चेत आली होती.

सोनाली कुलकर्णी हिचं पहिलं लग्न अपयशी ठरलं, पण घटस्फोटाचं कारण समोर आलं नाही. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न नचिकेत पंत-वैद्य यांच्यासोबत केलं. सोनाली – नचिकेत यांनी २०१० मध्ये लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. आज पती आणि मुलीसोबत अभिनेत्री आनंदी आयुष्य जगत आहे.

सांगायचं झालं तर, सोनाली तिच्या खासगी आयुष्यामुळे तर चर्चेत असतेच, पण अभिनेत्री अनेक तिच्या वक्तव्यांमुळे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. अभिनेत्रीने विवाहित महिलांसाठी एक विचित्र विधान केलं होतं. त्यामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं..

सोनाली म्हणाली होती, ‘भारतात महिला आळशी झाल्या आहेत. महिलांना फक्त असा नवरा किंवा प्रियकर हवा असतो. जो चांगला कमावतो, श्रीमंत असेल, त्याचं घरही चांगले असेल…’ अभिनेत्रीच्या अशा वक्तव्यामुळे अनेकांनी सोनालीचा विरोध केला. सोशल मीडियावर रंगत असलेल्या चर्चा पाहून अभिनेत्रीने माफी देखील मागितली होती.