सोनम कपूरने मुंबईची तुलना केली सगरेटशी, ‘सार्वजनिकरित्या सिगारेट ओढते बाकी…’

| Updated on: Mar 02, 2025 | 12:35 PM

मुंबईची तुलना सगरेटशी करत सोनम कपूर म्हणाली, 'मी वर्षातून 15 वेळा सार्वजनिकरित्या सिगारेट ओढते बाकी...', अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट तुफान व्हायरल, सोनम कपूर कायम तिच्या वक्तव्यामुळे असते चर्चेत, सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा...

सोनम कपूरने मुंबईची तुलना केली सगरेटशी, सार्वजनिकरित्या सिगारेट ओढते बाकी...
Follow us on

दिल्ली येथील हवेची गुणवत्ता खालावली आहे. आता मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पतळी देखील खालावली आहे. यावर अभिनेत्र सोनम कपूर हिनो सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट केली आहे. ज्यामुळे सध्या सर्वत्र सोनम आणि तिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीचं समर्थन केलं आहे, तर अनेकांनी अभिनेत्रीवर निशाण साधला आहे. अभिनेत्री प्रत्येक विषयावर स्वतः मत उघडपणे व्यक्त करते. यावेळीही सोनम हिने मुंबईच्या वक्तव्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

सोनम कपूरच्या पोस्टबद्दल बोलण्याआधी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबद्दल जाणून घेवू, मुंबईचा AQI 119 आहे, जो खूप वाईट आहे. जेव्हा हा आकडा 50 पेक्षा कमी असतो तेव्हा तो चांगला मानला जातो.

पोस्ट शेअर करत काय म्हणाली सोनम

इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘मी वर्षातून कदाचित 15 दिवस सामाजिकरित्या सिगारेट ओढते. बाकीच्या वेळी मी एक श्वास घेणारी मुंबईकर असते. त्या हवेची चवही तशीच आहे. मुंबई मार्लबोरो लाईट होती. मार्लबोरो लाईट हा एका सिगारेट कंपनीचा ब्रँड आहे.’ या ब्रँडच्या चवीची तुलना सोनमने मुंबईच्या हवेशी केली आहे. मुंबईच्या हवेची चव आणि त्या सिगरेटची चव सारखीच असल्याचे अभिनेत्रीचे म्हणणं आहे.

सोमन कपूरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी अभिनेत्रीचं समर्थन केलं आहे. तर अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘किमान ती लोकांना निसर्गाबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘दिल्लीत प्रदूषण फार आहे. पुढे काय होईल माहिती नाही…’

अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा देखील साधला. एक नेटकरी अभिनेत्रीला म्हणाला, ‘मुंबई सोड, लंडनला जा’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘महागड्या गाड्या वापरणं बंद करा… इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करा…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तू मुंबईत राहत नाहीस मग का काळजी करतेस…’ सध्या सर्वत्र सोनमच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सोनम  कपूर आता पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.