मुंबई : सोनी टीव्हीचा प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचा (Kaun Banega Crorepati) सीझन 12 आता सुरू आहे. जेव्हापासून हा खास शो सुरू झाला तेव्हापासूनच त्यात विचारले जाणारे प्रश्न चर्चेत राहिले आहेत, परंतू संध्या शोचा कर्मवीर विशेष एपिसोड गाजत आहे. आता आजच्या कर्मवीर विशेष एपिसोडमध्ये दोन पाहुणे येणार आहेत, त्यामध्ये अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देखील दिसणार आहे.( Sonu Sood in Kaun Banega Crorepati today’s episode)
सोनू सूद आणि प्रशांत गाडे (Prashant Gade) हे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर हॉटसीटवर बसणार आहेत. या भागाचे शूटिंग यापूर्वीच झाले आहे, त्यातील काही भाग सोनू सूदने त्यांच्या ट्विटवर शेअर केले आहे. केबीसीच्या सेटवर सोनू सूद यांचे ‘आई एम नो मसीहा’ (I Am No Messiah) या पुस्तकही प्रदर्शित करण्यात आले आहे.
What a way to begin the New Year. Here I am with one of India’s most admired & loved men—Amitji? catch us at 9pm tonight on KBC unveiling my book, I’m no Messiah.
Happy beginnings for everyone around the global fraternity. Keep doing what you do best❤️ @SrBachchan @Meena_Iyer pic.twitter.com/MTIjpwstuo— sonu sood (@SonuSood) January 1, 2021
या आठवड्यात कर्मवीर स्पेशलला येणारा दुसरा पाहुणा म्हणणे प्रशांत गाडे आहेत. अभियंता प्रशांत गाडे यांना नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, परंतु कुटुंबातील सदस्यांनी त्यांना या कामात सहकार्य केले नाही. जेव्हा एका आईने अपंग मुलीला प्रशांतकडे आणले तेव्हा प्रशांत ती मुलगी पाहिल्यावर तो स्तब्ध झाला. त्या मुलाला दोन्ही हात नव्हते. प्रशांतने मुलीसाठी एका कंपनीकडून दोन कृत्रिम हात मागितले तेव्हा कंपनीने 24 लाख रुपयांची मागणी केली, जे कठीण होते. पण प्रशांत हार मानला नाही, आज तो फक्त 25 हजारांत कृत्रिम हात तयार करतो.
संबंधित बातम्या :
Animal | रणबीरकडून न्यू इयर गिफ्टची घोषणा, अनिल कपूरसोबत पहिल्यांदाच सिनेमात
नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी शिल्पा शेट्टी कुटुंबासह गोव्यात, सुट्टींचा आनंद लुटण्यात मग्न
( Sonu Sood in Kaun Banega Crorepati today’s episode)