चाहत्याने मागितला चक्क स्मार्टफोन, सोनूने दिले ‘हे’ भन्नाट उत्तर!

| Updated on: Feb 28, 2021 | 12:53 PM

लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांना केलेल्या मदतीमुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चर्चेत आला.

चाहत्याने मागितला चक्क स्मार्टफोन, सोनूने दिले हे भन्नाट उत्तर!
तरुणीने सोनू सूदला केली बॉयफ्रेण्ड देण्याची विनंती
Follow us on

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांना केलेल्या मदतीमुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चर्चेत आला. स्थलांतरित कामगारांना नुसतीच प्रवासापुरती मदत करून तो थांबला नाही. त्याने आपल्या मदतकार्याच्या सीमा आणखी विस्तारल्या. ज्यांनी कोणी त्याच्या मदतीची अपेक्षा केली, त्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी सोनू सूद पुढे आला. (Sonu Sood’s fan asked for a smartphone, the actor replied in a tweet)

सोनू सूद आता पण लोकांना वेगवेगळ्या मदत करत आहे. नुकताच सोनूच्या एका चाहत्याने त्याला एक मदत मागितली मात्र, त्या चाहत्याला सोनूने भन्नाट उत्तर दिले आहे. चाहत्याने लिहिले की, आमचा सुपर हिरो सर्वांच्या मदतीला धावून जाणारे सोनू सर, मी माझ्या मित्रांसमोर महाग स्मार्टफोन खरेदी करणार असल्याची शप्पथ घेतली आहे आणि ती पण माझ्या आईची पण आता मी महाग स्मार्टफोन घेऊ शकत नाही.

आणि आईची शप्पथ घेतल्यामुळे मी चिंतीत आहे माझी मदत करा. यावर उत्तर देताना सोनूने लिहिले आहे की, आईची शप्पथ घेऊन कोणाची तरी मदत कर…आई जास्त आशिर्वाद देईल…फोन तर सर्वांजवळ आहे पण आशिर्वाद…सोनूच्या या भन्नाट उत्तराची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. सोनू शेवटी रणवीर सिंहच्या सिंबा चित्रपटात विलनच्या भूमिकेत दिसला होता. सोनू आता अक्षय कुमारच्या पृथ्वीराज चित्रपटातमध्ये व्यस्त आहे.

हरियाणातील एका गावात स्लो-इंटरनेट स्पीडमुळे तिथल्या विद्यार्थ्यांना झाडावर चढून अभ्यास करावा लागत होता. ही गोष्ट सोनू सूदच्या लक्षात येताच, त्याने या गावात थेट मोबाईल टॉवरची (Mobile Tower) व्यवस्था करून दिली. स्लो-इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन अभ्यासात अडथळा येत होता. शिक्षणासाठी त्यांना ‘झाडावरची कसरत’ करावी लागत होती.

या आधी सोनू सूदने चंदीगडमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होण्यासाठी स्मार्टफोनचे वितरणही केले होते. दरम्यान, सोनू सूदच्या या कार्याची दाखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली आहे. महामारी काळात समाजकार्य केल्याबद्दल सोनू सूदला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात (यूएनडीपी) विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संबंधित बातम्या : 

Video: अंकिता लोखंडेचा ‘तो’ व्हिडीओ येताच चाहत्यांकडून अनफॉलो; कमेंट्समध्ये काय लिहलं तुम्हीच वाचा!

Amitabh Bachchan Health Update : अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, ब्लॉग शेअर करत म्हणाले…

Video : धर्मेंद्र यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत, चाहतेही म्हणाले व्वा!

(Sonu Sood’s fan asked for a smartphone, the actor replied in a tweet)