जिया खान प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर सूरज पांचोली याने व्यक्त केली मोठी इच्छा, म्हणाला, माझ्या जीवनावर डॉक्यूमेंट्री

| Updated on: Jul 09, 2023 | 8:02 PM

सूरज पांचोली याच्यावर सतत जिया खान प्रकरणात आरोप करण्यात आले. हे प्रकरण तब्बल 10 वर्षे कोर्टात सुरू होते. शेवटी काही दिवसांपूर्वीच कोर्टाने या प्रकरणातील निकाल दिला असून सूरज पांचोली याची निर्दोष मुक्तता केली आहे. आता सूरज पांचोली हा चर्चेत आहे.

जिया खान प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर सूरज पांचोली याने व्यक्त केली मोठी इच्छा, म्हणाला, माझ्या जीवनावर डॉक्यूमेंट्री
Follow us on

मुंबई : अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरज पांचोली (Sooraj Pancholi) याचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. जिया खान हिच्या आईने सूरज पांचोली यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. हे प्रकरण बरीच वर्षे कोर्टात सुरू होते. सूरज पांचोली यानेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक दावा जिया खान (Jiah Khan) हिची आई सतत करत आहे. नुकताच सूरज पांचोली याची निर्दोष मुक्तता ही करण्यात आलीये. सबळ पुराव्याच्या अभावी कोर्टाने सूरज पांचोली याची मुक्तता केली आहे. मात्र, जिया खान हिच्या आईने सांगितली की, मी माझ्या मुलीच्या न्यायासाठी लढत राहणार असून पुढची लढाई कोर्टात सुरू ठेवणार आहे.

विशेष म्हणजे जिया खान मृत्यू प्रकरणात तब्बल दहा वर्षांनी निकाल आला. सूरज पांचोली याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पांचोली कुटुंबियांकडून पेढे देखील वाटण्यात आले. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. ज्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आणि या प्रकरणात सूरज पांचोली याचे नाव पुढे आहे.

सूरज पांचोली याची दहा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता या प्रकरणात करण्यात आल्यापासून सतत सूरज पांचोली हा चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सातत्याने रंगत असून असे सांगितले जात आहे की, सूरज पांचोली हा बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार आहे. यावर अत्यंत स्पष्ट बोलताना सूरज पांचोली हा दिसला आहे.

सूरज पांचोली याने स्पष्ट सांगितले की, मी कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार नाहीये. बिग बाॅसची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. मात्र, मी सहभागी होणार नाही. कारण माझ्यावर विदेशात जाण्यासाठी बंधने होती आणि आरोपही होते. यादरम्यानच्या काळात माझ्या हातून अनेक चित्रपट गेली आहेत.

कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यापेक्षा आता मी माझे पूर्ण लक्ष हे फक्त चित्रपट आणि वेब सीरिजकडे देत आहे. मला माझ्यावर आधारित डॉक्यूमेंट्रीमध्ये काम करण्यास नक्कीच आवडले. कारण यामुळे बऱ्याच गोष्टींचा खुलासा हा केला जाऊ शकतो. मी जे कुठेच बोलू शकत नाही ते या डॉक्यूमेंट्रीमध्ये नक्कीच दाखवले जाऊ शकते. आता खरोखरच सूरज याच्या जीवनावर डॉक्यूमेंट्री तयार होते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.