मुंबई : दिवंगत अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) प्रकरणात न्यायालयाने अंतिम निर्णय सुनावला आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर जियाच्या आईने लेकीचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सूरज पंचोली (Sooraj Pancholi) याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिनेत्रीच्या निधनला सूरज जबाबदार असल्याचं जियाच्या आईचं म्हणणं होतं. आता 10 वर्षे उलटल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणी अभिनेत्याची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, जिया खान प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज याला अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आहे. ज्यामुळे अभिनेता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.
दरम्यान, १० वर्षांनंतर जिया खान प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला होता. अभिनेत्याला सिद्धिविनायक मंदिरात पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या सूरज याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.
व्हिडीओमध्ये सुरुवातीला अभिनेता गणपतीचा एक फोटो हातात घेवून पापाराझींना पोझ देताना दिसत आहे. तर दुसऱ्या हाताने बूट बाजूला केल्यानंतर पुन्हा गणपतीच्या फोटोला हात लावल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांना अभिनेत्यावर निशाणा देखील साधला आहे. सध्या सर्वत्र सूरजचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘बूटांना हात लावल्यानंतर देवाच्या फोटोला हात लावत आहे… असे लोक मंदिरात का जातात…’, दुसरा नेटकरी म्हणतो, ‘हे लोक फक्त देखाव्यासाठी मंदिरात जातात…’ व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर जिया खान प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर एक नेटकरी म्हणतो, ‘कर्म है लौट के आयेगा। जिंदगी बहुत लंबी हे, कही तो टकराएगा।’ अनेकांनी सूरजवर निशाणा साधला आहे.
सांगायचं झालं तर, ३ जून २०१३ साली जिया खान हिने स्वतःला संपवलं. जिया खान हिने एक नोट मागे ठेवली होती. अभिनेत्रीच्या नोटच्या आधारावर सूरज पांचोली याला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी अभिनेत्याला अटक देखील करण्यात आली होती. हे प्रकरण गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होते. एक नव्हे चार नव्हे तर तब्बल दहा वर्षांनी कोर्टाने या प्रकरणात आपला निकाल दिला आणि अभिनेत्याची निर्दोष मुक्तता केली.