तोच चेहरा, तेच हास्य, तेच डोळे… व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ‘सूर्यवंशममधल्या हिरा ठाकूरच्या पत्नीचा पुनर्जन्म’

| Updated on: Nov 01, 2023 | 6:01 PM

अभिनेत्री सौंदर्याची भूमिका असलेला सूर्यवंशम हा चित्रपट माहित नाही, असा भारतात एकही चित्रपट रसिक नसेल. हिरा ठाकूरच्या प्रेमात पडलेल्या राधाची भूमिका सौंदर्याने साकारली होती. सौंदर्याच्या ‘सौंदर्य’, अदाकारी आणि अभिनयाच्या प्रेमात अनेक जण होते, किंबहुना आजही असतील.

तोच चेहरा, तेच हास्य, तेच डोळे... व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले सूर्यवंशममधल्या हिरा ठाकूरच्या पत्नीचा पुनर्जन्म
अभिनेत्री सौंदर्या
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : हुबेहूब सेलिब्रिटींसारखे दिसणारे अनेकजण सोशल मीडियावर पहायला मिळतात. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन यांच्यापासून ते सारा अली खान, आलिया भट्ट या कलाकारांसारखे हुबेहूब दिसणाऱ्यांना तुम्ही आजवर पाहिले असतील. सोशल मीडियामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळते आणि दिसण्यातील साधर्म्यामुळे नेटकरीसुद्धा अनेकदा संभ्रमात पडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सौंदर्यासारखी हुबेहूब दिसणारी तरुणी पहायला मिळतेय. अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट तुम्हाला आठवलाच असेल. यामध्ये हिरा ठाकूरची भूमिका सौंदर्याने साकारली होती. मात्र फार कमी वयात तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता.

इन्स्टाग्रामवर ‘चित्रा जी 2’ या नावाच्या अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये दिसणारी महिला हुबेहूब सौंदर्यासारखीच आहे. तोच चेहरा, तेच हास्य आणि डोळेही अगदी तसेच. सौंदर्यासारखी हुबेहूब दिसणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ पाहून कोणीही क्षणभरासाठी संभ्रमात पडेल. तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. या तरुणीच्या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘मी सौंदर्या यांचा खूप मोठा चाहता आहे. तुम्ही हुबेहूब त्यांच्यासारखंच दिसता. मी जर कॅप्शन वाचलं नसतं तर मला समजलंच नसतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुला मी सौंदर्याच मानेन. कारण ती माझी सर्वांत आवडती अभिनेत्री होती’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘सूर्यवंशममधल्या हिरा ठाकूरच्या पत्नीचा पुनर्जन्म झाला’, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

चार्टर्ड विमानाच्या अपघातात सौंदर्याला प्राण गमवावे लागले होते. 17 एप्रिल 2004 चा तो दिवस होता. भाजपमध्ये प्रवेश केलेली सौंदर्या भाजप आणि तेलुगू देसम पक्षाच्या प्रचारासाठी बेंगळुरुला चालली होती. 100 फूट उंचीवर गेलेलं तिचं चार्टर्ड विमान खराब हवामानामुळे कोसळलं आणि पेटलं. या अपघातात सौंदर्यासह चौघा जणांचा मृत्यू झाला होता. जगाचा निरोप घेताना ती अवघी 31 वर्षांची होती.