साऊथच्या या अभिनेत्रीने केलं ‘एग फ्रीजिंग’; शेअर केला व्हिडीओ

| Updated on: May 03, 2024 | 1:55 PM

वाढत्या वयानुसार महिलांवर गरोदरपणाचा दबावही वाढत जातो. अशातच अनेकजण हल्ली एग्ज फ्रिजिंगचा पर्याय निवडत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री मेहरीन पीरजादानेही एग फ्रीज केलं आहे. त्याचा एक व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

साऊथच्या या अभिनेत्रीने केलं एग फ्रीजिंग; शेअर केला व्हिडीओ
South actress Mehreen Pirzada
Image Credit source: Instagram
Follow us on

बदलती जीवनशैली आणि कामाचा वाढलेला तणाव या परिस्थितीचा स्वीकार करून आजकाल अनेक वर्किंग वुमन आणि सेलिब्रिटी एग फ्रीजिंगचा पर्याय निवडत आहेत. एग फ्रीजिंग ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये महिलांच्या ‘एग’ला शरीरातून बाहेर काढून लॅबमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमानात फ्रीज केलं जातं. जवळपास दहा वर्षांपर्यंत तुम्ही या एगला फ्रीज करू शकता. एग फ्रीजिंग केल्यानंतर संबंधित महिलेला जेव्हा ‘बेबी प्लॅनिंग’ करायची असेल तेव्हा ते पुन्हा तिच्या शरीरात इम्प्लांट केले जातात. मोना सिंग, नेहा पेंडसे, रिधिमा पंडित यांसारख्या अभिनेत्रींनी आतापर्यंत एग फ्रीज केले आहेत. यात आता एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचाही समावेश झाला आहे. अभिनेत्री मेहरीन पीरजादाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिच्या एग फ्रीजिंगच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.

मेहरीनने तिच्या या पोस्टमध्ये लिहिलं की गेल्या दोन वर्षांपासून ती एग फ्रीज करण्याचा विचार करत होती. अखेर तिने याचा निर्णय घेतला. याविषयी तिने लिहिलं, ‘मी खुश आहे की अखेर मी हा निर्णय घेतला. माझ्या या खासगी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू नाही, याचा मी विचार करत होती. पण मला वाटतं की माझ्यासारख्या अनेक महिला असतील, ज्यांनी आतापर्यंत लग्न कधी करायचं, बेबी प्लॅनिंग कधी करायची याचा निर्णय घेतला नसेल. माझ्या मते महिलांनी आपलं भविष्य सुरक्षित करण्याची गरज नाही. नंतरच्या समस्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.’

हे सुद्धा वाचा

एग फ्रीजिंग प्रक्रियेदरम्यान वेदना होतात का?

एग फ्रीजिंगच्या अनुभवाविषयी मेहरिनने पुढे लिहिलं, ‘यात वेदना होतात का? तर कधी कधी होतात. हे आव्हानात्मक आहे का? होय, खूपच जास्त. विशेषकरून माझ्यासाख्या व्यक्तीसाठी, ज्यांना सुई, रक्त आणि रुग्णालयांची खूप भीती वाटते. मी प्रत्येक वेळी रुग्णालयात गेल्यानंतर बेशुद्ध होते. हार्मोनल इंजेक्शनमुळे तुमचे खूप मूड स्विंग्स होतात. हे सर्व सोपं नाही. पण जर तुम्ही मला विचारलं की, हे सर्व सहन करण्यालायक हा निर्णय आहे का? तर अर्थात होय.’

कधी करू शकता एग फ्रीजिंग?

25 ते 30 या वयोगटातील महिला एग फ्रीज करू शकतात. वयाच्या चाळिशीपर्यंत ही प्रक्रिया केली जाऊ शकते. मात्र 25-30 या वयोगटात महिलांच्या एगची गुणवत्ता चांगली असते. जसजसं वय वाढतं, तसतसं त्या एगची गुणवत्ता कमी होत जाते. यामुळे फर्टिलिटी कमी होत जाते. त्यामुळे ज्या महिलांना भविष्यात निरोगी बाळाला जन्म द्यायचा असेल आणि इतक्यात बेबी प्लॅनिंगची घाई नसेल तर ते एग फ्रीजिंगचा निर्णय घेऊ शकतात.

खर्च किती येतो?

एग फ्रिजिंगची प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण केली जाऊ शकते. यामध्ये महिलांच्या एगला बाहेर काढून ते लॅबमध्ये फ्रीज केलं जातं. तुम्ही जवळपास दहा वर्षांपर्यंत तुमच्या एगला फ्रीज करून ठेवू शकता. या प्रक्रियेचा खर्च जवळपास 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. तर एगला फ्रोजन स्टेटमध्ये ठेवण्यासाठी दरवर्षी 15 ते 30 हजार रुपये भरावे लागतात.