प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा आणि ‘या’ अभिनेत्रीने केलं टक्कल, लोकांनी साधला निशाणा

| Updated on: Jan 26, 2024 | 10:47 AM

Actress Life : प्रसिद्ध अभिनेत्राला प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान टक्कल करणं पडलं महागात... फोटो व्हायरल होताच..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री आणि तिने केलेल्या टक्कलची चर्चा

प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा आणि या अभिनेत्रीने केलं टक्कल, लोकांनी साधला निशाणा
Follow us on

मुंबई | 26 जानेवारी 2024 : झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. काही अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. तर काही अभिनेत्री त्यांच्या डान्समुळे… तर काही अभिनेत्रींच्या अध्यात्मावर असलेला विश्वास चाहत्यांना आकर्षित करतो. अशात अभिनेत्रींना फॉलो करण्यापासून चाहते स्वतःला थांबवू शकत नाहीत. आता देखील अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अभिनेत्रीने टक्कल केल्यामुळे तिच्यावर चाहत्यांनी निशाणा साधला. सध्या अभिनेत्री फक्त आणि फक्त तिने केलेल्या टक्कलमुळे चर्चेत आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा वाणी (south actress Surekha vani) आहे. सुरेखा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री फक्त तिच्या अभिनयामुळे नाही तर, सध्या केलेल्या टक्कल मुळे देखील चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

सुरेखा हिने टक्कल केल्यानंतर स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. सुरुवातीला अभिनेत्रीला बाल्ड लूकमुळे ट्रोल करण्यात आलं. पण जेव्हा लोकांना कळलं की अभिनेत्री धर्मासाठी टक्कल केलं… तेव्हा अनेकांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं… असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

सुरेखा वाणी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा जन्म 29 एप्रिल 1981 मध्ये आंध्र प्रदेश याठिकाणी झाला. सुरेखा हिने थलापती विजय याच्यासोबत मास्टर आमि मेर्सल यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सुरेखा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

साऊथ सिनेविश्वात सुरेखा हिच्या नावाचा सर्वत्र बोलबाला असतो. सुरेखा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुरेखा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा देखील वर्षाव करत असतात.