प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीला भीषण अपघात, मृत्यूशी सुरुये झुंज

| Updated on: Mar 18, 2024 | 9:36 PM

Actress Accident : प्रसिद्ध अभिनेत्री अपघाताची बळी ठरली आहे. ती सध्या व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाशी झुंज देत आहे. आता अलीकडेच अभिनेत्रीच्या बहिणीने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीला भीषण अपघात, मृत्यूशी सुरुये झुंज
Follow us on

Arundhati Nair : मनोरंजन क्षेत्रातून अनेकदा धक्कादायक बातम्या येत असतात ज्यामुळे चाहते दु:खी होतात. आता अशीच एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये एका अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती नायर ही मृत्यूला झुंज देत आहे. 14 मार्च रोजी केरळमधील कोवलममध्ये अभिनेत्रीचा अपघात झाला होता. अपघातानंतर अभिनेत्रीला तिरुअनंतपुरम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बातमीला अरुंधती नायरची बहीण आरती नायर हिने दुजोरा दिला आहे, तिने म्हटले आहे की, अभिनेत्री गंभीर जखमी झाली आहे.

अरुंधती नायर व्हेंटिलेटरवर

अरुंधती नायरची बहीण आरती नायरने तिच्या इंस्टा वर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आम्हाला तामिळनाडूच्या वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनेलमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली. माझी बहीण अरुंधती नायर हिचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला ही बातमी खरी आहे. ती गंभीर जखमी झाली आहे. अरुंधती रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे आणि जीवनासाठी संघर्ष करत आहे. यासोबतच आरतीने चाहत्यांना तिच्या बहिणीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.

अभिनेत्रीच्या करिअर विषयी

अरुंधती नायर हिने 2014 साली ‘पोंगी एझू मनोहरा’ या तमिळ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. विजय अँटोनी यांच्या ‘सैथान’ या चित्रपटाने ती प्रसिद्ध झाली. 2018 मध्ये, तिने ‘ओट्टाकोरू कामुकन’ मधून मल्याळम सिनेमात प्रवेश केला. तिने ‘शाइन टॉम चाको’ सोबत ओट्टाकोरू कामुकनमध्येही काम केले. तिचा शेवटचा चित्रपट ‘पोर्कसुकल’ गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.