मुंबई – साऊथ चित्रपटाचे सुपरस्टार चिरंजीवी (South Superstar Chiranjeevi) हे सुध्दा कोरोनाचे (corona) शिकार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (corona positive)आल्यानंतर त्यांनी स्वत: हून ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. ही माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून चाहत्यांना दिली असून त्यामध्ये त्यांनी मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना सुध्दा काळजी घ्या असं म्हणटलं आहे. त्याचबरोबर सोबत असलेल्या सगळ्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन सुध्दा केले आहे. ही त्यांनी नुकतीच आपल्या ट्विटवरती टाकली आहे.
‘मी चाचणी केली आहे, ती पॉझिटिव्ह आली आहे, सौम्य लक्षणे आढळली आहेत. आता मी घरी विलगीकरणात आहे. यादरम्यान माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी चाचणी करून घ्यावी ही विनंती आहे.
Dear All,
Despite all precautions, I have tested Covid 19 Positive with mild symptoms last night and am quarantining at home.
I request all who came in contact with me over the last few days to get tested too.
Can’t wait to see you all back soon!
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 26, 2022
चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
ही बातमी समजल्यानंतर चिरंजीवीचे अनेक चाहते सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रार्थना करू लागले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीशी संबंधित सर्व मित्रही चिरंजीवीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतं आहेत. निर्माता श्रीनिवास कुमन यांनी चिरंजीवीसाठी लिहिले आहे की, ‘गेट वेल सून बॉस’, चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनीही चिरंजीवीसाठी म्हटले की ‘सर लवकर बरे व्हा.’
संपर्कात आलेल्या सगळ्यांनी टेस्ट करावी
कोरोनाचा संसर्ग इतका वाढला आहे की, काही कलाकारांनी आपले चित्रपट पुढे ढकलले आहेत. तसेच तयार असलेले चित्रपट रिलीज करण्यात आलेले नाहीत. कोरोनाची काळजी घेऊन सुध्दा अनेक कलाकारांना कोरोना झाल्याचे पाहावयास मिळत आहे. नुकतेच चिरंजीवी यांना कोरोना झाल्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या सगळ्यांना चाचणी करून काळजी घ्या असं सांगितलं आहे.
कोरोनामुळे देशात चिंता
देशभरात कोरोनाचं वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकांनी काळजी घेऊनही कोरोनाने त्यांना गाठलं आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट देशभरात सुरू आहे. त्यामुळे अनेकांना कोरोना झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोनाच्या काळात अनेकांनी आपली साथ अर्धवट सोडली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे.