झगमत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. सेलिब्रिटींच्या आलिशान घरापासून ते त्यांच्या महागड्या कपड्यांपर्यंत अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. एवढंच नाहीतर, आपला फेव्हरेट सेलिब्रिटी त्याच्या खासगी आयुष्यात कसा आहे… अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांमध्ये फक्त बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीतर, दाक्षिणात्य सिनेविश्वातील कलाकारांची क्रेझ गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेता चिरंजीवी यांनी स्वतःबद्दल मोठा खुलासा केला.
दक्षिणेतील बहुतेक सेलिब्रिटी त्यांच्या नम्र स्वभावासाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी, विजय देवरकोंडा आणि चिरंजीवी हैदराबादमध्ये तेलगू डिजिटल मीडिया फेडरेशनच्या कार्यक्रमात आले होते. दरम्यान, या दोन्ही अभिनेत्यांनी मध्यमवर्गीय असल्याबद्दल माध्यमांशीही चर्चा केली आहे.
सेलिब्रिटींनी बाथरुममधील काही गोष्टी सांगितल्या, ज्या मध्यमवर्गीयांप्रमाणे आहे. सांगायचं झालं तर, कार्यक्रमात विजय आणि चिरंजीवी एकत्र बसले होते. यावेळी दोघांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. सध्या सर्वत्र विजय आणि चिरंजीवी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
विजय म्हणाला, ‘माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. पण अजूनही माझ्यातील काही सवयी मध्यमवर्गीयांप्रमाणे आहेत. मी आज देखील देखील मध्यमवर्गीय मुलगा आहे. आता देखील शँम्पूची बाटली संपल्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकतो म्हणजे शँम्पूचा पूर्ण वापर होऊ शकेल…’ असं अभिनेता म्हणाला.
पुढे चिरंजीवी म्हणाला, ‘मी छोट्या – छोट्या साबणांचे तुकडे जोडून घेतो. तुकडे फेकण्यापेक्षा आणखी एक आठवडा त्याच साबणाचा मी वापर करतो. माझ्या कुटुंबाला वीज वाया घालवण्याची सवय आहे. अशात पूर्ण घरात फिरून मी सर्व दिवे बंद करतो…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘नुकताच राम चरण त्याच्या खोलीतील दिवे बंद न करता परदेशात गेला. तेव्हा ते दिवे मी बंद केले होते. मी पाण्याची देखील बचत करतो…’ सध्या सर्वत्र विजय आणि चिरंजीवी यांच्या सवयींची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून विजय त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे.