व्हॅनिटी व्हॅनबद्दल बोलायचं झालं तर सर्व सुविधा या व्हॅनमध्ये असतात. त्याच वेळी, याच्या किंमती देखील खूप जास्त आहे. जगातील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन 'eleMMent Palazzo' आहे, ज्याची किंमत सुमारे 18 कोटी आहे.
दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुनकडे भारतातील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन आहे, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.
सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास 4 कोटी रुपये आहे. व्यवस्थित सांगायचं तर, हे दोन रुम, हॉल, वॉशरुम आणि इतर सुविधांसह हलणारं घरच आहे.
शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. 'Volvo BR9' नावाची ही व्हॅन दिलीप छाब्रिया यांनी डिझाइन केली आहे. या 14 मीटर लांबीच्या वाहनात सर्व लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत.
दीपिका पादुकोणच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. ही व्हॅन वेगवेगळ्या भागात विभागली आहे - खासगी झोन, सिटिंग एरिया, पेंट्री आणि वॉशरूम, स्टाफ एरिया.
हृतिक रोशनकडे 'Mercedes V-Class' व्हॅनिटी व्हॅन आहे ज्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे. 12 मीटर लांबीच्या या वाहनाचे 3 भाग आहेत. त्याचा पहिला भाग ऑफिस आहे, मधला भाग बेडरूम आहे आणि शेवटी वॉशरूमचा भाग आहे.