मुंबई | निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्स आहेत. जान्हवी आणि खुशी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोघी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण आता प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्याबद्दल नाहीतर, खुशी कपूर हिच्याबद्दल चर्चा रंगत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खुशी कपूर हिच्या खासगी आयु्ष्याबद्दल चर्चा रंगत आहे. एका प्रसिद्ध गायकासोबत खुशी कपूर हिच्या नावाची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, गायकाने खुशी कपूर हिचं नाव घेतल्यामुळे रंगणाऱ्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात खुशी कपूर हिच्यासोबत ज्या गायकाचं नाव जोडलं जात आहे, तो नक्की कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल…
खुशी कपूर हिच्या सोबत ज्या गायकाचं नाव जोडलं जात आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून पंजाबी गायक एपी ढिल्लों (AP Dhillon) आहे. एपी ढिल्लों याने एका गाण्यात खुशी कपूर हिच्या नावाचा उल्लेख केला. एपी ढिल्लों याने खुशीचं नाव घेतल्यामुळे सोशल मीडियावर असंख्य नेटकरी गायकाला ट्रोल करत आहेत.. शिवाय, सुरुवात कशी झाली… असा प्रश्न देखील विचारत आहेत..
पंजाबी गाण्यात एका ओळ आहे. ज्यामध्ये गायकाने खुशीचं नाव घेतलं आहे. ‘जदों हस्से तन लागे तू खुशी कपूर’ याचा अर्थ, ‘जेव्हा तुम्ही हासता, तेव्हा हुबेहूब खुशी कपूर हिच्यासारखे दिसता…’ या एका ओळींमुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे.. शिवाय खुशी कपूर आणि एपी ढिल्लों यांनी ऑनलाईल ट्रोल करत आहेत…
सोशल मीडियावर सध्या खुशी कपूर आणि एपी ढिल्लों यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. पण दोघांनी देखील रंगणाऱ्या नात्यावर कोणताही खुलासा केलेला नाही. एपी ढिल्लोंने नुकताच एनएमएसीसीच्या उद्घाटनप्रसंगी परफॉर्म केलं होतं. नंतर, त्याने मुंबईत लोल्लापलूजासाठी देखील परफॉर्म केले आणि डिसेंबर 2021 मध्ये त्याने एक संगीत कॉन्सर्ट केला ज्यामध्ये जान्हवी कपूर उपस्थित होती.
खुशी कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, श्रीदेवी यांच्या दुसऱ्या मुलीने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. खुशी कपूर दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या ‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान, महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.