मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील त्यांच्या आठवणी कुटुंबिय आणि चाहत्यांच्या मनात कायम आहेत. 2018 मध्ये श्रीदेवी यांनी दुबई येथे अखेरचा श्वास घतेला. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी संपूर्ण देशभर पसरली तेव्हा बॉलिवू़ड आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. श्रीदेवी आता या जगात नाहीत… यावर कोणाचा विश्वासत बसत नव्हता. श्रीदेवी यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली होती. अभिनेत्रीचं अंतिम दर्शन घेण्यासाठी देखील चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
सांगायचं झालं तर, श्रीदेवी कुटुंबातील एक लग्नासाठी दुबई येथे पती बोनी कपूर यांच्यासोबत गेल्या होत्या. दुबईतून बोनी कपूर भारतात परतले. पण श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आलं. रिपोर्टनुसार, दुबई येथे पतीसोबत बाहेर जाण्यासाठी श्रीदेवी तयार होत होत्या. पण खूप वेळ झाला तरी श्रीदेवी बाथरुममधून बाहेर येत नव्हत्या.
अशा परिस्थितीत बोनी कपूर देखील घाबरले होते. अखेर बाथरुमचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा श्रीदेवी बाथटबमध्ये पडलेल्या होत्या. त्यांचा श्वास देखील थांबला होता. श्रीदेवी यांना तात्काळ रुग्णालयात देखाल करण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.
रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तपास देखील केला. पण तीन दिवसांत केस बंद देखील करण्यात आली. मृत्यूनंतर श्रीदेवी यांना दुबईतून मुंबईल आणलं. श्रीदेवी यांच्यामृत्यूनंतर त्यांना नव्या नवरीप्रमाणे सजवण्यात आलं होतं. एवढंच नाही तर, त्यांच्या तोंडात सोन्याचा तुकडा देखील ठेवण्यात आला होता.
दाक्षिणात्य भागात एक परंपरा आहे. वैवाहिक महिलेचं निधन झाल्यास अंत्यसंस्काराच्या वेळी तिच्या तोंडात सोन्याचा तुकडा किंवा सोन्याचा पान ठेवण्याची प्रथा आहे. या प्रथेला तांबूल असं म्हणतात. श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी आणु खुशी पूर्णपणे कोलमडल्या होत्या. दोघी कायम आईच्या आठवणी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. एवढंच नाहीतर, अनेक मुलाखतींमध्ये देखील दोघी आईबद्दल बोलताना दिसतात.
श्रीदेवी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केला. श्रीदेवी भारतीय सिनेविश्वातील पहिल्या महिला सुपरस्टार होत्या. आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत.