RRR सिनेमाने रचला आणखी एक विश्वविक्रम ; ‘या’ पुरस्कारवर नाव कोरल्यानंतर राजामौली म्हणाले…

| Updated on: Feb 25, 2023 | 11:58 AM

एस एस राजामौली यांच्या 'आरआरआर' सिनेमाला मिळतंय जगभरातून प्रेम; ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर सिनेमाने 'या' पुरस्कारवर कोरलं नाव... सिनेमाची सर्वत्र चर्चा...

RRR सिनेमाने रचला आणखी एक विश्वविक्रम ; या पुरस्कारवर नाव कोरल्यानंतर राजामौली म्हणाले...
Follow us on

RRR : एस एस राजामौली (ss rajamouli ) यांचा ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा गेल्या काही दिवसांपासून नवीन विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. सिनेमाची चर्चा फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील रंगली. सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ग्रॅमी पुरस्कार जिंकत विक्रम रचला. आता सिनेमा आणखी विक्रम रचताना दिसत आहे. आरआरआर सिनेमाने हॉलीवुड क्रिटिक एसोशिएशन अवॉर्ड 2023 वर देखील स्वतःचं नाव नोंदवलं आहे. सिनेमाला आता एकूण चार पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमाला आता बेस्ट इंटरनेशनल फिल्म कॅटेगरीसाठी पुरस्कार मिळाला आहे.

हॉलीवुड क्रिटिक्स एसोशिएशनने त्यांचया ट्विटर हँडलवरुन ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. महत्त्वाचं म्हणजे आरआरआर सिनेमाने ‘अर्जेंटीना 1985’ सिनेमाला मागे टाकत नवीन विश्वविक्रम रचला आहे. याशिवाय इतर तीन श्रेणींमध्ये या सिनेमाला पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाव्यतिरिक्त, सिनेमाला सर्वोत्कृष्ट ऑरिजनल सॉन्ग आणि सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा श्रेणींमध्ये सन्मान मिळाला आहे.

 

 

आरआरआर सिनेमाला पुरस्कार मिळाल्यानंतर टीम प्रचंड आनंदी आहे. या आनंदाच्या क्षणी राम चरण म्हणाला, ‘सर्वांना माझा नमस्कार… मला स्टेजवर यायचं नव्हतं, पण दिग्दर्शकांनी सांगितलं माझी साथ दे… इतकं प्रेम तुम्ही सर्वांनी दिलं म्हणून आभार. आता यापुढे देखील तुमचं मनोरंजन करणं ही आमची जबाबदारी आहे. HCA चे देखील आभार…’ (HCA Award for Best International Film)

पुरस्कार आरआरआर सिनेमाला मिळाल्यानंतर एस एस राजामौली यांनी देखील भावना व्यक्त केल्या, ‘देशातील माझ्या प्रत्येक दिग्दर्शकासाठी आनंदाचा क्षण… आपण प्रत्येक जण आंतरराष्ट्रीय सिनेमा साकारु शकतो. HCA चे आभार आणि प्रेम… जय हिंद…’ असं राजामौली म्हणाले.

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाने १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला गोळा केला. ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलेला आरआरआर सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत देखील सामील झाला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे.

RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. यामध्ये रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.