गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता अरबाज खान याने मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर देखील अरबाज – शूरा यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. कधी विमानतळावर तर कधी डीनर डेटसाठी गेलेल्या अरबाज – शूरा यांना पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. आता देखील अरबाज – शूरा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अरबाज – शूरा यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, अरबाज – शूरा यांना एका रुग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे खान कुटुंबात लवकरच नवीन पाहुण्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबद्दल अरबाज – शूरा यांना विचारण्यात देखील आलं. तेव्हा अरबाज काहीही बोलला नाही. पण शूरा मात्र ‘नाही…’ म्हणत निघून गेली. अरबाज – शूरा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेटकरी देखील अरबाज – शूरा यांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कुटुंब आता मोठं होणार असं वाटत आहे…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दोघे एकत्र किती चांगले दिसतात…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘खान कुटुंबात नवीन पाहुणा येणार…’
अरबाज याने शूरा हिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना देखील धक्का बसला. कारण अरबाज – शूरा यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणाला माहिती नव्हतं. जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अरबाज – शूरा यांनी लग्न केलं. दोघांनी लग्न केल्यानंतर अरबाज – शूरा यांच्या वयाबाबत अनेक चर्चा रंगल्या.
दरम्यान एका शूरा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा खुलासा केला होता. शूरा म्हणाली होती, ‘माझी उंची 5.1 आहे तर, अरबाज याची उंची 5.10 आहे. वयाचं सांगायचं झालं तर, तो फक्त एक आकडा आहे…’ अरबाज – शूरा कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात.
सोशल मीडियावर देखील अरबाज – शूरा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सांगायचं झालं तर, अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज याने शूरा हिच्यासोबत लग्न केलं. लग्नात मलायका – अरबाज यांचा मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता.