Stree 2: थिएटरमध्ये जाण्याचा वेळ नाही तर घरबसल्या 29 रुपयांत पाहू शकता ‘स्त्री 2’; जाणून घ्या कसं?

| Updated on: Aug 18, 2024 | 8:09 AM

‘स्त्री 2’ या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्यासोबतच अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी यांच्याही भूमिका आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’चा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता.

Stree 2: थिएटरमध्ये जाण्याचा वेळ नाही तर घरबसल्या 29 रुपयांत पाहू शकता स्त्री 2; जाणून घ्या कसं?
Stree 2
Image Credit source: Instagram
Follow us on

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. तर अवघ्या दोन दिवसांत या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 15 ऑगस्टनंतर मोठा वीकेंड आल्याने त्याचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचं पहायला मिळतंय. मात्र काही कारणाने जर तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नसेल किंवा वेळ मिळत नसेल तर तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण ‘स्त्री 2’ हा चित्रपट तुम्हाला घरबसल्या किंवा मोबाइलवर कुठेही पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त पैसेसुद्धा खर्च करावे लागणार नाहीत. ‘स्त्री 2’ हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सीक्वेल आहे. पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार ‘स्त्री 2’ हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याची स्ट्रीमिंग तारीख अद्याप समोर आली नाही. थिएटरमधून हा चित्रपट निघाल्यानंतर काही दिवसांनी तो ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे ओटीटीवर तुम्ही हा चित्रपट अवघ्या 29 रुपयांत पाहू शकता. जिओ सिनेमा या ओटीटीचं तुम्ही 29 रुपयांमध्ये सबस्क्रिप्शन विकत घेऊ शकता. याशिवाय हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही स्ट्रीम होणार आहे.

हे सुद्धा वाचा

या हॉरर कॉमेडी चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत 2023 मधील सुपरहिट ‘ॲनिमल’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने 63.8 कोटी रुपये तर शाहरुख खानच्या ‘पठाण’ने 57 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार ‘स्त्री 2’ने पहिल्याच दिवशी तब्बल 64.8 कोटी रुपयांची कमाई केली. बुधवारी संध्याकाळीही या चित्रपटाचे काही शोज होते. त्यानंतर गुरूवारी देशभरातील थिएटर्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानुसार बुधवारी 9.4 कोटी आणि गुरुवारी 55.4 कोटी रुपयांची कमाई झाली.

अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. याआधी जानेवारी महिन्यात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाने 24.6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने 95 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र ही कमाई हिंदी, तेलुगू, तमिळ अशा विविध भाषांमध्ये मिळून झाली होती.