मुंबई : दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भागही प्रेक्षकांना आवडला आहे. यानंतर आता प्रेक्षक आश्रम या बेव सीरीजच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच प्रकाश झा यांनी आश्रम बेव सीरीजच्या यशाचे सेलिब्रेशन संपूर्ण टिमसोबत केले.प्रकाश झा यांनी सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचा फोटोही शेअर केला आहे, ज्यात संपूर्ण टिम केक कापताना दिसत आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहले आहे की, ‘आश्रम’ ला एवढे प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद 900 मिलियन व्यूज मिळाले आहेत आणि अजुनही व्यूज मिळत आहेत. आश्रमच्या दुसरा भाग बाबा निराला काशीपूरच्या गुन्ह्यांभोवती फिरली आहे. (celebration of the success of the web series ‘Ashram 2’)
अभिनेता बॉबी देओल आणि प्रकाश झा निर्मित ‘आश्रम’ या वेब सीरीजच्या दुसऱ्या पर्वाला करणी सेनेने विरोध देखील केला होता. वेब सीरीजच्या प्रदर्शनानंतर करणी सेनेने निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. धार्मिक भावना दुखावल्याने या वेब सीरीजवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणी सेनेने केली होती.
‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. करणी सेनेने वकिला मार्फत कायदेशीर नोटीसही प्रकाश झा यांना पाठवली होती.
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल अभिनित ‘आश्रम चॅप्टर-2’ या वेब सीरीजमध्ये सनातन धर्माशी संबंधित धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रित केल्याचा आरोप करत दिवाणी कोर्टाच्या वकिलाने जौनपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी अभिनेता बॉबी देओल आणि दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात खटलाही दाखल केला गेला. जौनपूर दिवाणी कोर्टाचे वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी उपेंद्र विक्रम सिंह यांच्यामार्फत न्यायालयात हा अर्ज दाखल केला होता.
संबंधित बातम्या :
(celebration of the success of the web series ‘Ashram 2’)