मुंबई | 31 जुलै 2023 : अभिनत्री कंगना रनौत कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कायम वादाचा मुकूट स्वतःच्या डोक्यावर घेवून मिरवणारी कंगना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःच्या आगामी सिनेमांची माहिती देण्याशिवाय अनेक मुद्द्यांवर परखड मत मांडताना दिसते. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींवर निशाणा साधत अनेक आरोप केले आहेत. ज्यामुळे कंगना हिला अडचणींचा देखील सामना करावा लागला. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र कंगना रनौत हिचीच चर्चा सुरु आहे.
कंगना हिने बॉलिवूडमधील गटबाजी, घराणेशाही यांसारख्या विषयांवर देखील निशाणा साधला. अभिनेता हृतिक रोशन पासून दिग्दर्शक करण जोहर याच्यापर्यंत कंगना हिने निशाणा साधला आहे. नुकताच अभिनेत्री रणबीर कपूर याचं नाव न घेता एक मोठा खुलासा केला आहे.
रणबीर याने मला डेटिंगसाठी विचारलं होतं… असा दावा अभिनेत्रीने केला होता. आता कंगना हिने भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कंगनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
I am not just a Bollywood star sir, I am also a very vocal and concerned citizen, I was the target of political malice in Maharashtra, at my expense nationalists could make a government here.
I also spoke about tukde gang and strongly condemned Khalistani groups.
I am also a… https://t.co/CXbcQPNysb— Kangana Ranaut (@KanganaTeam) July 30, 2023
सुब्रह्मण्यम स्वामी ट्विट करत म्हणाले, ‘SPG ला माहीत आहे आणि त्यांनी उपक्रमांची नोंदही ठेवली आहे.. तिच्या प्रकरणात मला आश्चर्य वाटतं की एसपीजीकडे बॉलीवूड स्टार्सवर लक्ष ठेवण्याशिवाय दुसरं कोणतेही महत्त्वाचं काम नाही. तिला आधिच सुरक्षा देण्यात आली आहे.’ पण सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये कंगनाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.
सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या ट्विटवर कंगना हिने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मी फक्त बॉलिवूड स्टार नाही तर मी परखड मत मांडणारी नागरीक आहे. मी महाराष्ट्रात राजकीय द्वेषाच्या निशाण्यावर आली होती. मी तुकडे गँग आणि खलिस्तानी गटांचा तीव्र निषेध केला…’
पुढे कंगना म्हणाली, ‘मी निर्माती लेखक देखील आहे. माझ्या येत्या ‘इमरजेन्सी’ सिनेमात ऑपरेशन ब्ल्यू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे… माझ्या जीवाला धोका आहे.. म्हणून मी सुरक्षेची मागणी केली… तर यामध्ये माझं काही चुकत आहे का सर?’ असा उलट प्रश्न अभिनेत्रीने सुब्रह्मण्यम स्वामी यांना विचारला आहे.
अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘इमर्जन्सी’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगनाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. यात कंगनाशिवाय अनुपम खेर, महिमा चौधरी, विशाल नायर आणि श्रेयस तळपदे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.