मुंबई : 6 नोव्हेंबर 2023 | झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. महत्त्वाचं अभिनेत्री त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या – वाईट गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘द कपिल शर्मा’ शोमधील सुगंधा मिश्रा आहे. सुगंधा हिने वयाच्या 35 व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी मराठमोळ्या पद्धतीने अभिनेत्रीच्या डोहाळे जेवणाचं कार्यक्रम देखील पार पडलं. कार्यक्रमाचे फोटो खुद्द सुगंधा हिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.
सुगंधा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री प्रत्येक क्षणाचे फोटो पोस्ट करत स्वतःबद्दल चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने ‘वर्क मोड’ असं लिहिलं होतं. एका नव्या प्रोजेक्ससाठी सुगंधा तयार झाली आहे.
अभिनेत्री म्हणाली, ‘आयुष्यात जेव्हा मी आनंदी असते, तेव्ही ती जागा माझ्यासाठी आनंददायी असते. मला वाटलं प्रग्नेसीमध्ये काम करणं माझ्यासाठी कठीण असेल. पण मी स्वतःला भाग्यशाली समजते, की या काळात देखील मला काम करता येत आहे. आव्हानात्मक आहे, पण मी करु शकते.’ असं अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुगंधा मिश्रा हिची चर्चा रंगत आहे.
सुगंधा हिने विनोदवीर ‘द कपिल शर्मा’ शोच्या माध्यमातून चाहत्यांना खळखळून हासण्यास भाग पाडलं. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत असतात.