बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान कायम लेक सुहाना खान हिच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसतो. अनेक ठिकाणी शाहरुख लेक सुहाना हिच्यासोबत उपस्थित असतो. सोशल मीडियावर देखील शाहरुख, सुहाना हिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सुहाना देखील बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘द अर्चिस’ सिनेमातून सुहाना हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे.
‘द अर्चिस’ सिनेमाच्या स्क्रिनींग दरम्यान देखील सुहानाचे कुटुंबिय तिच्या सोबत होतं. तेव्हा देखील शाहरुख – सुहाना यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शाहरुख कायम लेकीबद्दल बोलतना दिसतो. शिवाय एका मुलाखतीत किंग खान याने सुहाना हिच्या बॉयफ्रेंडसाठी काही नियम ठरवून दिले होते.
लेकीच्या बॉयफ्रेंडसाठी किगं खान याने ठरवून दिलेले नियम जाणून तुम्हाला देखील मोठा थक्का बसेल. तर जाणून घेऊ सुहाना हिच्या बॉयफ्रेंडसाठी काय आहेत किंग खानचे नियम… पहिला नियम म्हणजे जॉब शोधा… दुसरा नियम – मला तू आवडत नाही, असं समजून घे… तिसरा नियम – एक वकील करून ठेव… चौथा नियम – मला पुन्हा तुरुंगात जावं लागलं तरी कहीही हरकत नाही… पाचवा नियम – ती माझी प्रिंसेस आहे तुझा विजय नाही… सहावा नियम – मी प्रत्येक ठिकाणी आहे… सातवा नियम – तु जे कही तिच्यासोबत करशील, ते तुझ्यासोबत मी करेल… असे नियम किंग खान याने ठरवून दिले होते.
शाहरुख खान लेक सुहाना हिच्यासाठी प्रचंड प्रॉटेक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज सुहाना हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र सुहाना हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहे.
सुहाना हिच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. सुहाना लवकरच ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सुहाना पहिल्यांदा वडील शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या खांद्यावर आहे. चाहते देखील दोघांना एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक आहेत. सोशल मीडियावर देखील सुहाना कायम सक्रिय असते. किंग खान याची लेक असल्यामुळे सुहानाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.