Starkid Life in Bollywood: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांना सिनेमांध्ये काम मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. आई – वडिलांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमुळे स्टार किड्सना बॉलिवूडचे मार्ग मोकळे असतात. सेलिब्रिटी किड्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री सोपी असली तरी, ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना कष्ट तर घ्यावेच लगतात. पण सर्वच सेलिब्रिटी किड बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळी जागा निर्माण करु शकत नाही. असं एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलीसोबत देखील झालं आहे.
सध्या ज्या स्टारकिडची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेते सुनिल शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आहे. अथिया हिने अभिनेता सलमान खानच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
अथिया हिचा पहिला ‘हिरो’ सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर आणखी एका सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली ‘मुबारकां’ सिनेमातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली. पण तिचा दुसरा सिनेमा देखील फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘नवाबजादे’ सिनेमात अथियाने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली आणि 2019 मध्ये अभिनेत्री ‘मोतीचूर चकनाचूर’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली. पण अथियाचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला नाही. अथियाने फक्त 4 सिनेमांमध्ये भूमिका साकारली. पण एकाही सिनेमातून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करु शकलेली नाही.
आता अथिया बॉलिवूडपासून दूर तिच्या संसारात रमली आहे. अथिया हिने जवळपास तीन वर्ष भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर के.एल.राहुल याला डेट केल्यानंतर 2023 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल ढाली होते.
काही दिवसांपूर्वी अथियाने चाहत्यांसोबत ‘गुडन्यूज’ देखील शेअर केली. 2025 मध्ये अथिया आणि राहुल त्यांच्या पहिल्या बाळाचं जगात स्वागत करणार आहेत. सांगायचं झालं तर, अथिया तिच्या प्रोफेशनल आयुष्यात फेल ठरली तरी, खासगी आयुष्यामुळे मात्र कायम चर्चेत असते.
अथिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.