मुंबई | देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दराचा फटका फक्त सर्वसामान्य जनतेलाच नाही तर, प्रसिद्ध सेलिब्रिटींना देखील पडत आहे. टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे अभिनेता सुनील शेट्टी यांचं देखील महिन्याचं गणित कोलमडलं आहे. टोमॅटोचे दर सतत वाढत असल्यामुळे अभिनेत्याने टोमॅटो खरेदी करणं कमी केलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्या टोमॅटोच्या वाढत्या दरांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र टोमॅटोचे वाढते दर आणि सुनील शेट्टी याच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे. शिवाय हॉटेलचा मालक असल्यामुळे अभिनेत्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.
टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत अभिनेता म्हणाला, ‘मी आणि माझी पत्नी कामय दोन दिवसांच्या भाज्या घरी आणतो. कारण आम्हाला ताज्या भाज्या खरेदी करायला आवडतात. आम्ही ऑनलाईन भाज्या खरेदी करतो. ऑनलाईन भाज्यांची खरेदी केल्यामुळे थोडीफार बचत होते. ऑनलाईन भाज्या स्वस्त मिळतात. एवढंच नाही तर भाज्या कुठून आल्या आहेत, कुठल्या मातीचा वापर केला आहे, या सर्वांची माहिती या ॲपवर दिली जाते. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होतो..’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘टोमॅटोचे दर वाढल्यामुळे मी टोमॅटोची खरेदी कमी केली आहे. टोमॅटो अधिक खात नाही. मी स्टार आहे, म्हणून सर्वांना असं वाटतं की या सर्व गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होत नसेल. पण असं काहीही नाही, सुपरस्टार असलो तरी या सर्व गोष्टींचा सामना आम्हाला देखील करावा लागतो…’
शिवाय अनेक गोष्टींच्या खरेदीबाबत अभिनेता म्हणाला, ‘मी एक अभिनेता असलो तर हॉटेलचा मालक आहे. प्रत्येक गोष्टी खरेदी करताना मोलभाव करून घेतो. टोमॅटोचे दर वाढत असतील आणि महागाई गगनाला भिडत असले तर मला देखील तडजोड करावी लागते. यासाठी मी माझ्या खंडाळ्याच्या फार्महाऊसमध्ये मी खूप साऱ्या भाजीपाल्याची झाडं लावली आहेत.’ असं देखील अभिनेता म्हणाला.
टोमॅटोच्या वाढत्या दरांबद्दल सांगायचं झालं तर, टोमॅटोचे दर १४० रुपये किलो रुपयांबद्दल पोहोचले आहेत. ज्यामुळे फक्त सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींच्या महिन्याचं गणित देखील कोलमडलं आहे. सध्या सर्वसामान्य जनता, सेलिब्रिटी आणि सोळल मीडियावर देखील टोमॅटोच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा रंगत आहे.
अभिनेता सुनील शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सुनील शेट्टी आता बॉलिवूडपासून दूर असला तरी अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्याने ऑनलईन भाज्यांची शॉपिंग आणि ज्यामुळे पैशांची होत असलेली बचत याबद्दल सांगितलं आहे.