सनी दओल – ऐश्वर्या राय यांचा कधीही प्रदर्शित न झालेला सिनेमा; एका सीनमुळे उडाली सर्वत्र खळबळ

| Updated on: May 13, 2023 | 4:52 PM

सनी दओल - ऐश्वार्या राय यांनी एकत्र स्क्रिन तर शेअर केली, पण सिनेमा रुपेरी पडद्यावर कधी प्रदर्शितच झाला नाही; एका सिनेमुळे उडाली सर्वत्र खळबळ... 'त्या' सिनेमाचं सत्य नक्की काय?

सनी दओल - ऐश्वर्या राय यांचा कधीही प्रदर्शित न झालेला सिनेमा; एका सीनमुळे उडाली सर्वत्र खळबळ
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल लवकरच ‘गदर २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र ‘गरद २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमाचं शुटिंग अंतिम टप्प्यात आहे. ११ ऑगस्ट रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. रुपेरी पडद्यावर पुन्हा राज्य करण्यासाठी सनी देओल सज्ज झाला आहे. शिवाय ‘गदर २’ सिनेमाबद्दल चाहत्यांच्या मनातील उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. अशात सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सनी देओल याचे अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीस आले, पण अभिनेत्याचा एक सिनेमा आतापर्यंत प्रदर्शित झालेला नाही. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेला एक सिनेमा मोठ्या पडद्यावर कधीच प्रदर्शित झाला नाही. काही कारणांमुळे ऐश्वर्या आणि सनी स्टारर सिनेमा डब्बाबंद झाला.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते – अभिनेत्री आहेत, ज्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. पण काही सेलिब्रिटींची जोडी मोठ्या पडद्यावर कधी आलीच नाही. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे, सनी देओल आणि ऐश्वर्या राय यांची जोडी आहे. सनी देओल आणि ऐश्वर्या राय ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते.

सनी देओल आणि ऐश्वर्या राय स्टारर ‘इंडियन’ सिनेमाची शुटिंग अंतिम टप्प्यात आली होती. पण सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होवू शकला नाही. ‘इंडियन’ सिनेमा त्या काळातील सर्वाचत जास्त बजेट असलेला सिनेमा होता. सिनेमात सनी – ऐश्वार्यावर एक गाणं देखील चित्रीत  करण्यात आलं होतं. शिवाय सिनेमात सनी – ऐश्वार्यावर चित्रीत केलेले अनेक बोल्ड सीन देखील होते. मिळालेल्या माहितीनुसार गाणं शूट करण्यासाठी तब्बल १.७५ कोटी रुपयांचा खर्च आला होता. पण काही कारणांमुळे सिनेमा प्रदर्शित होवू शकला नाही.

हे सुद्धा वाचा

सिनेनात सनी देओल डबल रोलच्या भूमिकेत दिसणार होता. आर्मी अधिकारी आणि दहशतवादी अशा दोन भूमिका अभिनेता सिनेमात साकारताना दिसणार होता. सिनेमासाठी तब्बल चार कोटी रुपये खर्च आला होता. पण अचानक सिनेमाची मध्येच शुटिंग बंद करावी लागली. सिनेमा प्रदर्शित का नाही झाला? या मागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.

महत्त्वाचं म्हणजे एका मुलाखतीत सनी देओल याने मोठं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली… अभिनेता म्हणाला, ‘काजोल, माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांसारख्या अभिनेत्रींनी माझ्यासोबत काम करण्यासाठी नकार दिला.. गदर सिनेमासाठी देखील अनेक अभिनेत्रींनी नकार दिला होता…’ आता प्रेक्षक सनी देओल याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.