मुंबई : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री आमीषा पटेल पुन्हा ‘गदर’ सिनेमामुळे चर्चत आले आहेत. अनेक वर्षांनंतर ‘गदर’ सिनेमाचा दुसरा भाग ‘गदर २’ चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘गरद २’ सिनेमासाठी प्रेक्षक आणि निर्मात्यांची पहिली निवड सनी आणि आमीषा पटेल दोघे होते. दोघांना कास्ट करण्यासाठी मात्र निर्मात्यांना मोठी रक्कम मोजावी लागली आहे. ‘गदर २’ सिनेमासाठी सनी आणि आमीषा यांनी कोट्यवधी रुपये मानधन घेतलं आहे. तर आज जाणून घेवू सनी आणि आमीषा यांनी ‘गदर २’ सिनेमासाठी किती कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
‘गरद’ सिनेमात सनी आणि आमीषा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. म्हणून ‘गदर २’ सिनेमासाठी देखील निर्मात्यांनी सनी आणि आमीषा यांची निवड केली. गेल्या काही दिवसांपासून सिनेमातील फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमात तारा सिंग याच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी सनीने तब्बल ५ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
‘गदर २’ सिनेमात ४६ वर्षीय अभिनेत्री आमीषा पटेल सकीनाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात सकीना ही भूमिका साकारण्यासाठी आमीषाने तब्बल २ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत असून चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमाच्या माध्यमातून आमीषा आणि सनी पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
‘गदर’ सिनेमात ‘जिते’ नावाच्या छोट्या मुलाची साकारणाऱ्या बालकलाकाराने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता ‘गदर २’ सिनेमात देखील उत्कर्ष शर्मा जिते ही भुमिका साकारताना दिसणार आहे. ही भुमिका साकारण्यासाठी उत्कर्ष याने तब्बल १ कोटी मानधान घेतलं आहे.
सनी देओल स्टारर ‘गदर’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. आजही सिनेमाचे डायलॉग आणि गाणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. आजही ‘गदर’ सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात. दरम्यान प्रेक्षक ‘गरद २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर सिनेमाच्या यशानंतर ‘गदर २’ सिनेमाच्या चर्चा आता रंगत आहेत.